तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना मोठे आवाहन, FDA कडून भगरबद्दल..

तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार स्वीकारल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. त्यातच आता तुकाराम मुंढे आणि एफडीएकडून मोठे आवाहन करण्यात आले. हे आवाहन भगरीबद्दल आहे.

तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना मोठे आवाहन, FDA कडून भगरबद्दल..
Tukaram Mundhe
| Updated on: Oct 16, 2026 | 9:16 AM

तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. त्यातच आता नवरात्रोत्सवात भगर आणि उपवासाचे पदार्थ खाताना काळजी घेण्याचे मोठे आवाहन तुकाराम मुंढे यांच्याकडून करण्यात आले. भगरीवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास अन्नविषबाधेचा धोका वाढलाय. भगर खरेदी करताना पॅकिंग आणि ‘बेस्ट बिफोर’ तारीख तपासण्याचे आवाहन केले. मुदतबाह्य आणि निकृष्ट भगर विकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगर आणि उपवासाचे पदार्थ खाताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने केले आहे.

भगर तयार करताना वापरल्या जाणाऱ्या धान्यावर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास विषद्रव्ये तयार होऊ शकतात. अशी भगर खाल्ल्यास अन्नविषबाधा होण्याचा धोका असतो. नागरिकांनी शक्यतो पाकीटबंद भगर खरेदी करावी. पॅकिंग दिनांक आणि बेस्ट बिफोर तारीख तपासूनच भगर वापरावी. भगर स्वच्छ आणि कोरड्या डब्यात साठवावी. शक्यतो तयार भगरीचे पीठ बाजारातून आणू नये.

Loading...

भगरीच्या दशम्या किंवा भगरीऐवजी खिचडी खाण्याला प्राधान्य द्यावे. पीठ आवश्यक तेवढेच दळून घ्यावे आणि जास्त दिवस साठवून ठेवू नये. भगर विक्रेत्यांनी शक्यतो पॅकबंद भगरीची विक्री करावी, घाऊक विक्रेत्यांकडून पावती घ्यावी आणि पॅकेटवर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक व पॅकिंग दिनांक असल्याची खात्री करावी. खुल्या स्वरूपात भगरीच्या पिठाची विक्री करू नये. मुदतबाह्य किंवा कमी दर्जाची भगर विक्रीसाठी ठेवल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर दिसतंय. एफडीएचा हॉटेल्सवर कारवाईचा बडगा, जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आली. तुळजापुरात भेसळयुक्त गूळ, खवा आणि संशयित तूप जप्त. मुदत संपलेले खाद्यपदार्थ विकल्याने धाराशिवमधील बेकरीवर कारवाई करण्यात आली.  नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, पेढा आणि तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us