AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपवासात रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? ट्राय करा भगरचे आप्पे, झटपट तयार होते रेसिपी

Navratri Fasting Recipe: नवरात्रीत नऊ दिवस उपवास करताना रोज काय खायचे हा प्रश्न पडतो. साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा भगरचे आप्पे ट्राय करा. ही रेसिपी खूप सोपी आहे.

उपवासात रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? ट्राय करा भगरचे आप्पे, झटपट तयार होते रेसिपी
Appe
| Edited By: | Updated on: Oct 14, 2026 | 2:07 PM
Share

नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा खिचडी, वडे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यंदा काहीतरी वेगळं आणि चविष्ट ट्राय करा. उपवासाच्या ९ दिवस रोज वेगळे काय खायचे हा मोठा प्रश्न असतो. शिवाय अनेकांना साबुदाणा वडा, चिप्स, फ्राईज असे तळलेले पदार्थ खाणे टाळायचे असते. तुम्हाला सुद्धा त्याच त्या पदार्थांचा कंटाळा आला असेल तर तुम्ही भगरचे आप्पे खाऊ शकता. हे आप्पे कमी तेलात तयार करता येतात. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी सुद्धा बनवून खाऊ शकता. विशेष म्हणजे हे आप्पे बनवणे खूप सोपे आहे आणि हे झटपट तयार होतात. चला तर मग जाणून घ्या उपवासासाठी भगरचे आप्पेची रेसिपी. भगरचे आप्पे बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

– १ वाटी भगर

– ३ उकडलेले बटाटे

– १०० ग्रॅम दही

– बारीक चिरलेली हिरवी मिरची

– बारीक किसलेले आले

– बारीक चिरलेली कोथिंबीर

– तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स

– काळी मिरी

– १ चमचा जिरे

– सैंधव मीठ

– तूप

भगरचे आप्पे बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम भगर ३ ते ४ तास भिजत ठेवा. ते भिजल्यावर पाण्याने चांगले धुवून बाजूला ठेवा. आता एका कढईत तूप गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेले आले आणि हिरवी मिरची घाला. सोबत बारीक कापलेले काजू, बदाम आणि किशमिश टाका आणि भाजून घ्या. उकळलेल्या बटाट्याचे साल काढून मॅश करा. आता हे कढईत टाकून मिक्स करा. त्यात सैंधव मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. हे सर्व नीट मिक्स करून घ्या. जेव्हा बटाटे भाजून कढईला चिकटणे थांबले तेव्हा गॅस बंद करा आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करा. शेवटी कोथिंबीर घाला. आता भिजवलेली भगर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. भगर बारीक करण्यासाठी त्यात दही वापरा. जेवढी भगर आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात दही घ्या. यात काळी मिरी पावडर आणि मीठ घाला. बॅटर तयार झाल्यावर त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवा. बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे बनवा. आप्पे पॅन गरम करून ते तुपाने ग्रीस करा. तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. बटाट्याचे गोळे साच्यात ठेवा आणि वर तयार केलेले भगरचे बॅटर घाला. जेणेकरून हे पिठ बटाट्याला नीट कव्हर करेल. आता झाकण ठेवून शिजवा. अधून मधून पलटत राहा. सर्व बाजूंनी नीट शिजल्यावर आप्पे बाहेर काढा. तुमचे उपवासाचे भगरचे आप्पे तयार आहे.

Follow Us
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान