तुकाराम मुंढे यांचा मोठा दणका, पुण्यातील प्रसिद्ध 9 हॉटेलवर कारवाई, थेट..
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात कारवाया वाढल्या आहेत. त्यातच आता पिंपरी चिंचवडकडे एफडीएने आपला मोर्चा वळवला आहे. एफडीएकडून काही हॉटेलवर कारवाई करण्यात आली.

तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात कारवाईचा बडगा उगारला आहे. सर्वत्र एफडीएकडून कारवाया केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका भेसळखोरांनी घेतला. त्यातच पुण्यात सतत कारवाई सुरू आहे. पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई करण्यात आली. इथे चांगले आणि स्वच्छ अन्न मिळते, याकरिता पुणेकर जात होते, त्याच हॉटेलमध्ये खाणीचे साम्राज्य असल्याचे दिसून आले. प्रसिद्ध रूपाली आणि वैशाली हॉटेलमधील खाणेरडा कारभार तुकाराम मुंढे यांच्या विभागाने पुढे आणला. हेच नाही तर या हॉटेलवर कारवाईही केली. त्यातच आता एफडीएने आपला मोर्चा पिंपरी चिंचवडकडे वळवला. पिंपळे सौदागर आणि वाकडमधील 9 हॉटेल्सवर FDA ने मोठी कारवाई केली.
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्स आणि खाद्य व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेंतर्गत 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 96 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चार आस्थापनांची नोंदणी निलंबित करण्यात आली तर पाच विनानोंदणी व्यवसायांना थेट कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कारवाई झालेली 9 आस्थापने
1)अनाया फॅमिली रेस्टॉरंट-पिंपळे सौदागर
2)लिटिल बिस्ट्रो बाय लिटिल दिल्ली-पिंपळे सौदागर
3)फन फूड अ टेस्ट ऑफ इंदोर-पिंपळे सौदागर
4)श्रीराम वडनाव-वाकड
5)न्यू पूना बेकरी-पिंपळे सौदागर
6)विजय वडेवाला-पिंपळे सौदागर
7)हॉटेल समर्थ व्हेज-तळवडे
8)बिस्मिल्लाह केटरर्स-वाकड
9)अप्पा इडली-वाकड
या कारवाईमुळे हॉटेल चालकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळतंय. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील औषध भांडारात निकृष्ट आणि संशयित दर्जाची औषधे आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. रुग्णालयातील गोदामातून 1 कोटी 72 लाखांचा, तर जेजुरीतील औषध उत्पादक कंपनीतून 17 लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. वैध उत्पादन परवानगीशिवाय औषधांचे उत्पादन आणि पुरवठा केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, संबंधित कंपनीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे.महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी मात्र जप्त औषधांचे मूल्य 1 कोटी 72 लाख नसून केवळ 11 लाख 95 हजार रुपये असल्याचा दावा केला आहे.