वारंवार वापरले तेल, फ्रीजमध्ये अस्वच्छता, खराब अन्न FDA ची मुंबईत थेट कारवाई, तुकाराम मुंढेंचा दणका..

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने मोठा धसका अनेकांनी घेतला. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे.  अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून मुंबई सह राज्यांमध्ये विविध ठिकाणी कारवाई केला जात आहे. त्यामध्ये मुंबईतील 17 हॉटेलवर नुकतीच कारवाई करण्यात आली.

वारंवार वापरले तेल, फ्रीजमध्ये अस्वच्छता, खराब अन्न FDA ची मुंबईत थेट कारवाई, तुकाराम मुंढेंचा दणका..
Tukaram Mundhe
| Updated on: Oct 15, 2026 | 7:54 AM

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात जोरदार कारवाया केल्या जात आहेत. त्यातच मुंबईत मोठी कारवाई नुकताच करण्यात आली. मोठ्या हॉटेल आणि रेस्टारंटवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून मुंबई सह राज्यांमध्ये विविध ठिकाणी कारवाई केला जात आहे. त्यामध्ये मुंबईतील 17 हॉटेलवर नुकतीच कारवाई करण्यात आली. धारावी येथील फेमस असलेल्या तेरेसा हॉटेल वरती देखील कारवाई करण्यात आली व त्यांचा तात्पुरता परवाना रद्द करण्यात आला असून हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. यासंदर्भात हॉटेल चालकास विचारपूस केली असता त्याने बोलण्यास नकार दिला. डॉमिनोज पिझ्झाच्या तीन प्रमुख शाखांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. मुंबईतील तीन प्रमुख ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली.

डॉमिनोज पिझ्झामध्ये कारवाईदरम्यान पथकाला घातक ठरू शकणाऱ्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडच्या तीन शाखांचे परवाने निलंबित करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली. परळ, बोरीवली आणि अंधेरी पूर्वेतील डॉमिनोज पिझ्झाच्य शाखांचा यात समावेश आहे. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे हॉटेल आणि फास्ट फूडमध्ये गंभीर प्रश्नचिनह उपस्थित केली जात आहेत.

Loading...

अन्न व औषध प्रशासनाने अचानक डॉमिनोजची तपासणी केली असता खळबळजनक प्रकार पुढे आला. तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या. पिझ्झा बनवण्याच्या आणि साठवणुकीच्या परिसरात मोठी अस्वच्छता आढळून आली. ग्राहकांना खराब अन्न आणि वारंवार वापरलेले तेल आढळून आले. हेच नाही तर फ्रीजमध्येही अस्वच्छता आढळून आली.

रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना टायटन घड्याळे भेट दिल्याप्रकरणी एफडीएने मोठी कारवाई केली. मुंबईतील तीन रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित. ऐच्छिक रक्तदान शिबिरात भेटवस्तू देण्यास NBTC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंध. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएकडून कारवाई. इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्तकेंद्राचा परवाना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला.

जे. जे. रुग्णालय रक्तकेंद्राचा परवाना 3 दिवसांसाठी निलंबित. बी. वाय. एल. नायर रुग्णालय रक्तकेंद्राचा परवाना 3 दिवसांसाठी निलंबित. तपासादरम्यान रक्तकेंद्रांमध्ये टायटन घड्याळे भेट दिल्याची पुष्टी. कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणीनंतर एफडीएकडून परवाना निलंबनाचे आदेश. जे. जे. आणि नायर रुग्णालय रक्तकेंद्रांची शासनाकडे अपील. दोन्ही रक्तकेंद्रांना निलंबन आदेशाविरोधात तात्पुरती स्थगिती. रक्तदान ही मानवतेची सेवा असून रक्तदात्यांना कोणत्याही प्रलोभनातून रक्तदानासाठी प्रवृत्त करू नये, अशी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची भूमिका आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us