महिला चहा करण्यासाठी गॅस जवळ गेली, पाईप लीक झाल्याने अग्नितांडव, अख्खा संसार जळून खाक

| Updated on: Mar 11, 2021 | 6:16 PM

गॅस सिलेंडरचा पाईप लीक झाल्याने घराला आग लागल्याची घटना वर्ध्यात घडली आहे (fire in hose due to gas cylinder pipe leak in Wardha).

महिला चहा करण्यासाठी गॅस जवळ गेली, पाईप लीक झाल्याने अग्नितांडव, अख्खा संसार जळून खाक
Follow us on

वर्धा : गॅस सिलेंडरचा पाईप लीक झाल्याने घराला आग लागल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. गिरड नजीकच्या आर्वी या भागात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत घरातील महिला जखमी झाली तर संपूर्ण घर जळून खाक झालं आहे. आगीमुळे जवळपास 10 लाखांचं नुकसान झालं आहे. घरातील महत्त्वाच्या वस्तूंसह शेतातील धान्य जळून खाक झाल्याने बाधित कुटुंबं उघड्यावर आलं आहे (fire in hose due to gas cylinder pipe leak in Wardha).

नेमकं काय घडलं?

गिरड नजीकच्या आर्वी येथील संजय चौके यांच्या पत्नी दुर्गा चौके सकाळी गॅसवर चहा बनवायला गेल्या. यावेळी गॅस सुरु करतांना रेग्युलेटर नळीतून गॅस लीक झाला. त्यानंतर अचानक पाईपने पेट घेतला. त्यामुळे महिलेच्या अंगावरील कपड्यांना देखील आग लागली. बघताबघता ही आग घरात सर्वत्र पसरली. या दुर्घटनेत दुर्गा चौके गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आलं.

गावकऱ्यांनी आग विझवली

घरात आग लागल्यानंतर गावकऱ्यांना आगीचे लोंढे दिसली. त्यानंतर संपूर्ण गावातील नागरिकांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी आगीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. घराघरातून पाणी आणून गावकऱ्यांनी आग विजवली. या आगीत संजय चौके यांच्या घरातील विक्रीसाठी आणलेले कपडे, कपाटातील रक्कम, तर 20 क्विंटल कापूस, तुरी, चणा, गहू, तांदूळ असे धान्य देखील भस्मसात झाले (fire in hose due to gas cylinder pipe leak in Wardha).

हेही वाचा : VIDEO : ना हेल्मेट, ना तोंडावर मास्क, नियमांची ऐशीतैशी, तरुणीची बाईकवर हात सोडून स्टंटबाजी