‘शक्ती’ कायद्याला मंजुरी, महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन : आनंद शिंदे

| Updated on: Dec 10, 2020 | 5:27 PM

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्ती कायदा मंजूर केल्याने लोकगीत गायक आनंद शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे

शक्ती कायद्याला मंजुरी, महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन : आनंद शिंदे
Follow us on

कल्याण : “महिलांसाठी सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचने (Folk Song Singer Anand Shinde) अभिनंदन करतो”. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्ती कायदा मंजूर केल्याने लोकगीत गायक आनंद शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे (Folk Song Singer Anand Shinde).

तसेच, लोकगीत गायक प्रल्हाद शिंदे यांच्या मोठ्या स्मारकाचे भूमिपूजन कल्याण पूर्वेत लवकर करण्याचा प्रयत्न करणार, अशी घोषणाही आनंद शिंदे यांनी यावेळी केली. माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या विकास कार्यक्रमानिमित्त आनंद शिंदे हे कल्याणमध्ये आले होते.

केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रभागात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन लोकगीत गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते पार पडले. महिलांवर होणाऱ्या आत्याचाराच्या विरोधात न्याय देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू केला आहे. त्याच धर्तीवर राज्यातही हा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी होती. यावर बोलताना आनंद शिंदे यांनी सांगितले की “सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता महिला बिनधास्त होतील, महिलांना न्याय मिळणार आणि महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम या सरकारने केलं आहे”, यासाठी मी सरकारचे अभिनंदन करतो.

“माझे वडील आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक कल्याण-डोंबिवली महापालिकेने पश्चिमेला लांब जागेत केले आहे. ते स्मारक कल्याण पूर्वेत व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे”, असंही यावेळी ते म्हणाले (Folk Song Singer Anand Shinde).

त्याचे भूमीपूजन लवकर केले जाईल अशी घोषणा आनंद शिंदे यांनी यावेळी केली. आडीवली-ढोकळी या परिसरात पाण्याची समस्या होती. केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ गायक शिंदे यांच्या हस्ते आज पार पडला. या कामासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठपुारवा केला आहे. पाण्याची समस्येच्या विरोधात या भागातील महिलांनी मोर्चे काढले होते. आज या कामाची सुरुवात होत असल्याने या परिसरातील पाणी समस्या सूटणार असल्याचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले.

Folk Song Singer Anand Shinde

संबंधित बातम्या :

लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग, राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार? मनसे आमदार राजू पाटलांचा गृहमंत्र्यांना सवाल

‘राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा’, भाजपचं राज्यभरात महिला अत्याचारविरोधात आक्रोश मोर्चे

आंध्रप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा लागू करावा, काँग्रेस नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र