द्राक्षांवरील केमिकल काढण्यासाठी फक्त पाण्याचा वापर न करता ‘या’ सोप्या उपायांचा करा अवलंब

द्राक्षांमध्ये कीटकनाशकांसह अनेक केमिकल फवारले जातात. मात्र द्राक्ष घरी आणल्यावर फक्त पाण्याने न धुता तुम्ही जर या सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यास द्राक्षांवरील सर्व केमिकल निघून जातील. चला तर मग आजच्या लेखात आपण या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

द्राक्षांवरील केमिकल काढण्यासाठी फक्त पाण्याचा वापर न करता या सोप्या उपायांचा करा अवलंब
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Mar 13, 2026 | 7:20 PM

गोड आणि रसाळ द्राक्षं खायला खूप चविष्ट असतात आणि मुलांना ती विशेषतः आवडतात. मात्र अनेक बाजारपेठांमध्ये द्राक्ष अशी असतात ज्यावर भरपूर केमिकलचा वापर केलेला असतो. कारण ही द्राक्ष कडक उन्हात देखील चांगले राहावे तसेच त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी कीटकनाशकांसह विविध केमिकलचा त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे जेव्हा आपण बाजारातून खरेदी केलेले द्राक्ष घरी आणून पाण्याने स्वच्छ धुऊन खातो. पण फक्त पाण्याने धुऊन द्राक्षांवरील केमिकल पुर्णत: निघत नाही आणि अशी द्राक्षे सेवन केल्याने आपल्या शरीराला गंभीर नुकसान होते.

खरं तर, द्राक्षं लवकर पिकवण्यासाठी आणि त्यांची चमक वाढवण्यासाठी त्यांना विशिष्ट केमिकलच्या पाण्यात टाकले जातात. यामध्ये केमिकल वॅक्सचा समावेश आहे, ज्यामुळे द्राक्षे जास्त चमकदार दिसतात आणि हीच चमक पाहून लोकं उच्च दर्जाची द्राक्ष समजून खरेदी करतात. पण आजच्या लेखात आपण द्राक्षांवरील केमिकल काढून टाकण्यासाठी या घरगूती उपायांचा अवलंब करा.

द्राक्ष लागवडीदरम्यान अनेक ठिकाणी कीटकनाशकांचा वापर केला जातो. योग्य स्वच्छता न करता त्यांचे सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. द्राक्षांवर सल्फर डायऑक्साइड सारखे संरक्षक देखील फवारले जातात. तसेच द्राक्षे खरेदी करताना तुम्ही कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे ते जाणून घेऊयात.

केमिकल युक्त द्राक्षांचे आरोग्यास होणारे नुकसान

बाजारात उपलब्ध असलेल्या द्राक्षांवर विविध केमिकल आणि कीटकनाशके वापरली जातात. ही द्राक्षे लवकर खराब होण्यापासून रोखतात आणि त्यांचा ताजेपणा टिकवून ठेवतात. आता प्रश्न असा आहे की या द्राक्षांचा आपल्या आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतो? तज्ञांच्या मते जर केमिकलयुक्त द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ली तर ती पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात. ज्यामुळे सतत पोट फुगणे, गॅस किंवा अपचन होऊ शकते. काही लोकांना ॲलर्जी देखील होऊ शकते. शिवाय, ते आपल्या मज्जासंस्थेवर देखील नकारात्मक परिणाम करू शकतात.

द्राक्षांमधून केमिकल या पद्धतीने काढा

मीठ आणि व्हिनेगर – द्राक्षांमधून केमिकल किंवा कीटकनाशके काढून टाकण्यासाठी मीठ आणि व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. एका भांड्यात भरपूर पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा मीठ आणि व्हिनेगर मिक्स करा. या पाण्यात द्राक्षे 10 मिनिटे ठेवा. यामुळे मोठ्या प्रमाणात त्यावरील केमिकल निघून जाऊ शकतात.

बेकिंग सोडा वापरा – द्राक्षांमधील केमिकल काढून टाकण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर देखील वापरू शकता. बाजारात स्वच्छतेसाठी बेकिंग सोडा आणि लिंबू उत्पादने उपलब्ध आहेत. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडासा लिंबाचा रस मिक्स करा. या पाण्यात द्राक्षे थोडा वेळ ठेऊन द्या. त्यानंतर द्राक्ष पुन्हा साध्या पाण्याने धुवा आणि नंतर खा.

कोमट पाण्याचा उपाय: द्राक्षे पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी, एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात द्राक्षे टाकून ठेवा. कोमट पाणी केमिकल किंवा इतर कीटकनाशके काढून टाकण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us