
राज्यातील 29 महापालिकांचा निवडणुका झाल्या आहेत. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक महापालिकांवर एकहाती सत्ता मिळाली. पूर्ण राज्याच्या नजरा मुंबई महापालिकेच्या निकालाकडे होत्या. पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याकरिता अनेकांनी दावा केला. मतदारांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला पसंती दिली असून युतीच्या हातात मुंबई महापालिका गेली. महापाैर भाजपाचाच होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना शिंदे गटही महापाैरपदासाठी दावा करत असल्याने समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपकडे शिवसेनेकडून अडीच अडीच वर्षासाठी मनपा महापौर पदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्व नगरसेवक ताज लॅंड्स एंडमध्ये मुक्कामी आहेत. पुढील तीन दिवस नगरसेवकांचा मुक्काम तिथेच असणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेकडून महापौर पदावर दावा केला जात असल्याने भाजपाकडून आपले नगरसेवक फोडले जाऊ नये, याकरिता शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले. भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पदे सोडावीत अशी शिवसेनेची भावना आहे. ताज लॅंड्स इथे शिवसेनेच्या सर्व 29 नगरसेवकांची कार्यशाळा असेल. सकाळी 10.30 ते 5 वाजेपर्यंत शिवसेनेचे अनुभवी नेते या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
नगरसेवकांनी हाऊसमध्ये कशी कामे करायची, कोणते मुद्दे मांडायचे, शिवसेनेची महायुतीत भूमिका काय असणार यावर मार्गदर्शन केले जाईल. भाजपाचे म्हणणे आहे की, 5 वर्ष आमचाच महापाैर असेल. पण याला शिवसेनेचा विरोध आहे. अडीच अडीच वर्ष महापाैर पद भाजपा आणि शिवसेनेकडे असावे, असे त्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या 29 नगरसेवकांनी भाजपाची साथ देऊ नये, याकरिता शिवसेना अलर्ट मोडवर आहे.
पहिल्यांदाच भाजपाचा महापाैर मुंबई महापालिकेवर बसणार आहे. मात्र, त्यापूर्वी मोठा टिवस्ट येताना दिसत आहे. आता भाजपाकडून एकनाथ शिंदे यांची मागणी मान्य केली जाते का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मुंबई महापालिकेत भाजपाचे 89 नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले असून मोठा विजय झाला. मात्र, महापाैरपदावर आता दोन्ही पक्षांमध्ये तणाव बघायला मिळत आहे.