मोठी बातमी! हायकोर्टातून बातमी धडकताच महायुतीचं टेन्शन वाढलं, बडे नेते रवाना, तातडीची बैठक, घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, हाय कोर्टातून बातमी येताच आता महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. तातडीची बैठक बोलवण्यात आली असून, महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

मोठी बातमी! हायकोर्टातून बातमी धडकताच महायुतीचं टेन्शन वाढलं, बडे नेते रवाना, तातडीची बैठक, घडामोडींना वेग
महायुतीच्या नेत्यांची बैठक
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 7:32 PM

सध्या राज्यभरात गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीचा विषय चांगलाच गाजत आहे. सरकारने गोकुळवर चार संचालक नेमण्याचा अध्यादेश काढला आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती. या मोर्चामधून सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशभरात फक्त अमुल आणि मदर इंडिया हे दोनच दुधाचे ब्रँड ठेवण्याचं षडयंत्र यामागे असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. तसेच गोकुळवर चार संचालक नेमण्याचा अध्यादेश हे मंत्री चंद्रकात पाटील आणि हसन मुश्रीफ यांचं पाप असल्याचंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सतेज पाटील यांचा मोर्चा होताच हायकोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे  उद्या  गोकुळची निवडणूक होणार आहे.  जे सदस्य निवडून आले होते, त्या 25 सदस्यांसोबतच  शाससाने अध्यादेश काढून ज्या सदस्यांची नियुक्ती केली होती, ते सदस्य देखील मतदान करणार आहेत, परंतु शासन नियुक्त सदस्यांचं मतदान हे वेगळं ठेवलं जाणार आहे.  एवढंच नाहीतर निकाल जाहीर करून अध्यक्षांची निवड देखील होणार आहे. परंतु संपूर्ण निवडणुकीची  प्रक्रिया ही अंतिम निकालाच्या अधिन असणार आहे. तसेच राज्य शासनाकडून करण्यात आलेली अध्यादेश स्थगितीची मागणी देखील फेटाळण्यात आली आहे.  अध्यादेश चूक की बरोबर हे अद्याप ठरलेलं नाही.

Loading...

दरम्यान हाय कोर्टातून आलेल्या या निर्णयानंतर आता पुढच्या काही तासांमध्येच गोकुळची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.  गोकुळ बाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर  महायुतीमध्ये हालचाली वाढल्या आहेत.  महायुतीच्या नेत्यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तातडीची बैठक होणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील,  प्रकाश आबिटकर यांच्यासह महत्त्वाचे नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. हे नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे रवाना झाले आहेत. या बैठकीमध्ये  अध्यक्ष निवडीबाबत  महत्त्वाची चर्चा होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us