AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट…

Tukaram Mundhe News : अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी आपल्याकडे घेतल्यापासून आयुक्त तुकाराम मुंडे तूफान चर्चेत आहेत. यादरम्यानच लोक त्यांना नायक म्हणत आहेत. एक दिवस मुख्यमंत्रिपद आणि अधिकार तुमच्याकडे दिले तर तुम्ही काय करणार या प्रश्नावर तुकाराम मुंडे यांनी अत्यंत खास उत्तर दिले.

एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट...
Tukaram Mundhe
| Updated on: Jul 08, 2026 | 10:37 AM
Share

धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे सध्या तूफान चर्चेत आहेत. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया होत आहेत. कधी भेसळयुक्तांवर कारवाई तर कधी बड्या हॉटेल आणि रेस्टारंटवर कारवाई त्यांच्याकडून सुरू आहे. ज्यामुळे भेसळयुक्तांचे धाबे दणाणली आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. हॉटेलमधील किचनमध्ये घाण दिसली की, थेट कारवाई होतंय. कोणाचीही गय केली जात नाही. यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने जितक्या कारवाया केल्या नाहीत, तेवढ्या कारवाया तुकाराम मुंडे यांनी आपल्या हातात पदभार स्वीकारल्यापासून केल्या जात आहेत. फक्त मुंबई, पुणे नाशिकच नाही तर राज्यभरात या कारवाया होत आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून तुकाराम मुंडेंचे काैतुक केले जात आहे. पनीर, दूध, दही सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू होती.

भेसळ करणाऱ्यांना सळो की पळो करून तुकाराम मुंडे यांनी सोडले. यादरम्यानच तुकाराम मुंडे यांची बदली होणार अशी जोरदार चर्चा रंगताना दिसली. ज्यानंतर लोक थेट याचा विरोध करताना दिसले. अखेर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, तुकाराम मुंडे यांनी बदली होणार नाही. तसा काही निर्णय नाही किंवा हालचालीही नाही. तुकाराम मुंडे आज जनतेच्या मनातील नायक आहेत.

नुकताच तुकाराम मुंडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला नायक चित्रपटासारखे एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवले आणि सगळे अधिकार दिले तर तुम्ही काय कराल? यावर तुकाराम मुंडे यांनी म्हटले की, लोकशाहीत असे अमर अधिकार कुणालाही नसतात. मी नेहमी सांगतो की, एक शासकीय कर्मचारी म्हणून आपले काम वरच्या स्तराला नेले पाहिजे.

ताकद देणे, मार्गदर्शन करणे, समाज जेवढा विकसित होईल तेवढा आपला देश आणि देशातील व्यक्ती विकसित होईल. मला कोणताही रोल दिला तरीही पुढचा एक इंच कसा वाढले आणि पारदर्शक करा असेल. काम झाले पाहिजे. मी एक शासकीय नोकर आहे. मला माझ्या मर्यादा नक्कीच माहिती आहेत. मला जर लोक नायक म्हणत असतील तर मी त्यांचा आभारी आहे. तुकाराम मुंडे गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने कारवाया करत आहेत, त्यावरून लोकांच्या मनात त्यांची एक वेगळीच छाप पडली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ