AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामसभेत तरुणाशी वाद, थेट मारहाण; गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी सरपंचाची दिलगिरी, म्हणाले…

जळगावच्या पाचोरा तालुक्यातील ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर माजी सरपंच सुनील पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

ग्रामसभेत तरुणाशी वाद, थेट मारहाण; गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी सरपंचाची दिलगिरी, म्हणाले...
former sarpanch apologizesImage Credit source: social media
| Updated on: Oct 04, 2026 | 11:06 PM
Share

जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावर तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणानंतर संबंधित तरुणाच्या तक्रारीवरून माजी सरपंचासह दोन जणांविरोधात पाचोरा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता या प्रकरणात तरुणाला मारहाण करणारे माजी सरपंच सुनील पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

ग्रामसभेत संबंधित तरुणाने प्रश्न विचारल्यानंतर माजी सरपंच सुनील पाटील यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीवरून माजी सरपंचासह दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

माजी सरपंच म्हणाले..

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनील पाटील यांनी आपण एक नागरिक म्हणून गावातील ग्रामसभेला गेलो होतो, असं सांगितलं. संबंधित व्यक्तीने त्यांच्या बखर प्लॉटमध्ये सांडपाणी सोडले होते. याबाबत लोकांनी सांगितल्यानंतर आपण ग्रामपंचायतीमध्ये 1 तारखेला तक्रार दिली होती, असं त्यांनी सांगितलं.

“मी त्याला या संदर्भात जाब विचारल्यानंतर तो मला अरेरावीची उत्तरे देत होता. त्या तरुणाला माझ्यासोबत विनाकारण भांडण करायचे होते. त्याने मुद्दामून अरेरावी केली व माझ्या अंगावर आला. माझा हेतू नसताना माझ्याकडून जे अनावधानाने घडले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं सुनील पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात