
शनिशिंगणापूर देवस्थानाचे माजी विश्वस्त नितीन शेटेंनी आत्महत्या केलीये. यामुळे मोठी खळबळ उडाली. नितीन शेटे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपली आहे. नितीन शेटे यांनी आत्महत्या नेमकी का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचाराची चाैकशी सुरू होती. त्यामध्येच हे प्रकरण झाल्याने खळबळ उडाली आहे.
विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या
मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे शनिशिंगणापूर गावात शोककळा पसरली आहे. तपास पूर्ण झाल्यावरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट येईल. काही दिवसांपासून शनिशिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचाराची चाैकशी सुरू असून त्यामध्येच नितीन शेटे यांनी आत्महत्येसारखी पाऊस उचलले आहे, यामुळे अनेक चर्चा रंगत आहेत.
धक्कादायक घटनेने संपूर्ण शनिशिंगणापूर गावात शोककळा
नितीन शेटे यांच्या आत्महत्येचे कारण तपासामध्ये पुढे येऊ शकते. नितीन शेटे यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास हा केला जातोय. नितीन शेटे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण शनिशिंगणापूर गावात शोककळा दिसतंय.
नितीन शेटे हे 2021 पासून शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या देवस्थानच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बनावट ऑनलाईन अँप प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पुजाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. मात्र, नितीन शेटे यांना या चौकशीसाठी कधीही पोलिसांनी बोलावले नव्हते किंवा त्यांना समन्सही बजावण्यात आले नव्हते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
त्यामुळे जर शेटे यांच्यावर चौकशीचा सासेमीरा नव्हता तर त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली याबाबत पोलीस तपास करत आहे. खरंतर शेटे यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाहून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देवस्थान परिसरात शोककळा पसरली आहे.