मुंबई हादरली, नौदल कर्मचाऱ्याच्या घरात सापडले 4 मृतदेह, पत्नी अन् मुलांना संपवलं मग स्वत:ही..

मुंबईच्या कुलाबा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्याच्या घरात एकाचवेळी चार मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईच्या कुलाबा परिसरात असलेल्या नेव्ही नगरमध्ये घडली आहे.

मुंबई हादरली, नौदल कर्मचाऱ्याच्या घरात सापडले 4 मृतदेह, पत्नी अन् मुलांना संपवलं मग स्वत:ही..
crime news
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 16, 2026 | 3:34 PM

मुंबईच्या कुलाबा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्याच्या घरात एकाचवेळी चार मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईच्या कुलाबा परिसरात असलेल्या नेव्ही नगरमध्ये घडली आहे. मृतांमध्ये नौदल कर्मचारी, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या नेव्ही कर्मचाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नौलद कर्मचारी हा गळफास लावलेल्या स्थितीमध्ये आढळून आला आहे, तर पत्नी आणि मुलांनी विष प्राशन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार शनिवारी ही घटना घडली आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात असलेल्या नेव्ही नगरमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय नौदलातील कर्मचाऱ्याने आपली पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय आहे, त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, या नेव्ही कर्मचाऱ्याचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे, तर दोन मुलं आणि पत्नीने विष प्राशन केलं आहे. दरम्यान पोलिसांनी आता हे चारही मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं खरं कारण कळणार आहे.

दरम्यान ज्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, त्यातील एकाचं वय अवघं दोन महिने तर एकाचं वय तीन वर्ष असल्याची माहिती समोर येत आहे. या नेव्ही कर्मचाऱ्याने टोकाचं पाउल का उचललं? यामागे नेमकं कारण काय होतं? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे,  मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us