किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांत आणखी चार तरुणांच्या तक्रारी

| Updated on: Oct 29, 2021 | 11:10 PM

किरण गोसावीने परदेशात नोकरी लावण्याच्या बहण्याने या तरुणांची फसवणूक केली असून पोलिसांनी चारही तरुणांना गोसावी विरोधात तक्रार अर्ज देण्यास सांगितले. तक्रार करणारे 3 तरूण लष्कर परिसरातील असून, एक वानवडी परिसरातील रहिवासी आहे.

किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांत आणखी चार तरुणांच्या तक्रारी
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीला अटक
Follow us on

पुणे : परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक करणारा आरोपी किरण गोसावीच्या विरोधात पुणे पोलिसांकडे आणखी चार तरूणांच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. किरण गोसावी मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंचही आहे. किरण गोसावीने परदेशात नोकरी लावण्याच्या बहण्याने या तरुणांची फसवणूक केली असून पोलिसांनी चारही तरुणांना गोसावी विरोधात तक्रार अर्ज देण्यास सांगितले. तक्रार करणारे 3 तरूण लष्कर परिसरातील असून, एक वानवडी परिसरातील रहिवासी आहे. या चार जणांचे अर्ज आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Four more youths lodge complaints against Kiran Gosavi with Pune police)

पालघरमधील दोन तरुणांचीही फसवणूक

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे.

मलेशियात नोकरीचं आमिष

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.

कोण आहे किरण गोसावी?

किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता. (Four more youths lodge complaints against Kiran Gosavi with Pune police)

इतर बातम्या

‘पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो’; मलिकांचा फडणवीसांवर पलटवार

अॅपलला मागे टाकून मायक्रोसॉफ्ट बनली ‘किंग’, जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचे बाजारमूल्य किती?