गडचिरोलीमध्ये संविधानाचा विजय, 38 वर्षानंतर नक्षली हल्ल्याविना ग्रामंपचायत निवडणूक संपन्न

| Updated on: Jan 23, 2021 | 3:28 PM

38 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत नक्षलवाद्यांचा हल्ला झाला नाही.Gadchiroli Gram Panchayat election

गडचिरोलीमध्ये संविधानाचा विजय, 38 वर्षानंतर नक्षली हल्ल्याविना ग्रामंपचायत निवडणूक संपन्न
गडचिरोली ग्रामपंचायत निवडणूक
Follow us on

गडचिरोली: गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भाग व माओवाद्यांच्या कारवाया होणारा असलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत गडचिरोली जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनानं इतिहास घडवला आहे. गेल्या 38 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत नक्षलवाद्यांचा हल्ला झाला नाही. गडचिरोलीमध्ये अनेक ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. कोणत्याही अनुचित घटनेशिवाय ग्रामपंचायत निवडणूक पार पडली हा भारतीय संविधानाचा विजय असल्याचं बोललं जातेय. (Gadchiroli Gram Panchayat election two Phase completed without any naxal attack )

जिल्ह्याच्या स्थापनेपासून प्रथमच शांततेत निवडणूक

गडचिरोली जिल्ह्याची स्थापना 1982 मध्ये झाली. तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये नक्षलवाद्यांकडून अडचणी निर्माण केल्या जायच्या. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 1982 मध्ये झाली तेव्हा पासून 2020 पर्यंत निवडणुकीत नक्षलवाद्यांच्या कारवायांच्या सावटाखाली निवडणुका व्हायच्या. कधी मतदान केंद्रावर चकमक तर कधी पोलिंग पथकाचे ताफे जाणाऱ्या मार्गावर भुसुंरग स्फोट अशा अनेक घटना घडल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जवानांनी निवडणुकीच्या ड्युटीवर असताना आपल्या प्राणाची आहुती दिली. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक घेणे शासनासमोर एक मोठं आव्हान होते. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं एक महिन्यांपासून पूर्वतयारी केल्यानं यदांच्या दोन टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या.

अंकित गोयल, पोलीस अधीक्षक

गडचिरोलीमध्ये दोन टप्प्यात मतदान

जिल्ह्यात होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या कारवाया पाहता गडचिरोलीमध्ये 360 ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. गडचिरोलीमध्ये ग्राम पंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्याचं आव्हान प्रशासनासमोर होते. एक महिन्यापासून संवेदनशील, अतिसंवेदनशील गावं अशी विभागणी करुन पोलिसांनी तयारी केली. मतदान असलेल्या भागात मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची पथके तीन दिवसा अगोदर हेलिकॉप्टरनी पाठवली जातात. यावेळी ग्राम पंचायत निवडणूक जाहीर होताच चांगलं नियोजन गडचिरोली प्रशासनाकडून करण्यात आलं.

पोलीस बंदोबस्तात मतपेट्या गावोगावी पोहोचवण्यात आल्या.

15 जानेवारी आणि 20 जानेवारी अशा दोन टप्प्यात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. दोन टप्पयात निवडणूक घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला. जिल्ह्याच्या निर्मितीपासूनचा आतापर्यंत शातंतेत निवडणूक पार पडाण्याचा विक्रम प्रशासनानं केला आहे. दोन टप्पयातील 360 ग्राम पंचायतीची मतदान प्रक्रिया शंतातेत पार पाडली. पहिल्या टप्प्यात 82 टक्के मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात 78 टक्के मतदान झाले.

गडचिरोली पोलीस

पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचं श्रेय

ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली याचं श्रेय पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचं आहे. मतदानासाठी जंगलातून पायदळी नदी नाले ओलांडून मतदान पथके पोहचविणे, मतदान यंत्र परत पोहोचवण्याचं श्रेय गडचिरोलीच्या जनतेसह पोलीस विभागा व जिल्हा प्रशासनाचं असल्याचं गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एक महिनाभर सूक्ष्म नियोजन केल्याचं अंकित गोयल यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी दीपक सिंगला आणि जिल्हा पोलीस प्रमुख अंकित गोयल यांच्या प्रयत्नानं ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या.

गडचिरोलीमध्ये मतदानादरम्यान हेलीकॉप्टरचा वापर करण्यात आला.

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निकालात ट्विस्ट, आधी विजयाचा गुलाल उधळला, प्रमाणपत्रावर भलताच निकाल

कुटुंबाच्या विरोधानंतरही ग्रामपंचायतीत बाजी, पठ्ठ्याचा शर्ट काढून दंड थोपटत जल्लोष

(Gadchiroli Gram Panchayat election two Phase completed without any naxal attack )