VIDEO | कुटुंबाच्या विरोधानंतरही ग्रामपंचायतीत बाजी, पठ्ठ्याचा शर्ट काढून दंड थोपटत जल्लोष

कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला, पण शेजाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे शहापुरातील उमेदवार निवडून आला. (Shahapur Candidate Celebrates Dances opening Shirt)

  • सुनील घरत, टीव्ही 9 मराठी, शहापूर
  • Published On - 16:00 PM, 20 Jan 2021
VIDEO | कुटुंबाच्या विरोधानंतरही ग्रामपंचायतीत बाजी, पठ्ठ्याचा शर्ट काढून दंड थोपटत जल्लोष

शहापूर : ग्रामपंचायत निवडणुका कुटुंबीयांच्या पाठिंब्यावर जिंकल्याच्या प्रतिक्रिया अनेक विजयी उमेदवारांनी दिल्या आहेत. मात्र कुटुंबाच्या विरोधानंतरही निवडणूक मारणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी समोर आली आहे. साहजिकच हाय टेंशन असलेल्या या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर उमेदवारानेही फुल ऑन सेलिब्रेशन केले. अंगातील शर्ट काढून दंड थोपटत शड्डू ठोकून उमेदवाराने जल्लोष केला. या विजयोत्सवाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Shahapur Gram Panchayat Election Shivsena Candidate Celebrates Dances Opening Shirt)

शहापुरातील उमेदवाराला कुटुंबातूनच विरोध

कुटुंबातील सदस्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोध केला, पण शेजाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे शहापुरातील उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आला. आनंद व्यक्त करण्यासाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवाराने आपल्या अंगातील शर्ट काढला. त्यानंतर दंड थोपटून आणि शड्डू ठोकून त्याने विजयोत्सव साजरा केला.

अल्याणी गावातून शिवसेनेचे उमेदवार

शहापूर तालुक्यातील अल्याणी गावातील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे उमेदवार विनायक सापळे हे विजयी झाले. विशेष म्हणजे त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी त्यांना विरोध केला होता. सापळेंचा दारुण पराभव करण्यासाठीही कुटुंबातील सदस्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

कुटुंबाने नाकारलं, शेजाऱ्यांनी स्वीकारलं

कुटुंबातील काही नातेवाईक जरी सोबत नसले तरी शेजारी आणि गावातील अनेक जणांनी विनायक सापळे यांची ठामपणे साथ दिले. त्यामुळेच ते ग्रामपंचायत आल्याणी गावातील प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आले.

कुटुंबाला दाखवण्यासाठी मतमोजणी कार्यालयाबाहेरच जल्लोष

विरोध करणाऱ्या आपल्याच कुटुंबातील नातेवाईकांना दाखवून देण्यासाठी विनायक सापळे यांनी मतमोजणी तहसील कार्यालयातून बाहेर पडताच अंगातील शर्ट काढला. त्यानंतर दंड थोपटून जल्लोष करत आनंद साजरा केला.

पाहा व्हिडीओ :

ठाणे जिल्हा- शहापूर ग्रामपंचायती जाहीर निकाल (Shahapur Gram Panchayat Election Shivsena Candidate Celebrates Dances Opening Shirt)

एकूण ग्राम पंचायती – 05

काँग्रेस – 00
राष्ट्रवादी – 00
शिवसेना – 03
भाजप – 02
मनसे – 00
स्थानिक आघाडी – 00
महाविकास आघाडी- 00

संबंधित बातम्या :

Video: ग्रामपंचायत निकालाची बात न्यारी, गावकऱ्यांकडून विजयी लेकीची थेट घोड्यावरुन मिरवणूक

यशस्वी स्त्रीच्या मागे, खंबीर पुरुषाचाही हात असतो, महाराष्ट्रात व्हायरल होणाऱ्या फोटोमागची कहाणी!

(Shahapur Gram Panchayat Election Shivsena Candidate Celebrates Dances Opening Shirt)