गडचिरोलीतील जखमी जवानांवर नागपुरात उपचार, चार जखमींना हेलिकॅप्टरने पाठविले

| Updated on: Nov 14, 2021 | 2:23 PM

गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जंगलात पोलीस आणि नक्षल चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या मोहिमेत हे जवान सहभागी झाले होते. या चारही जवानांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

गडचिरोलीतील जखमी जवानांवर नागपुरात उपचार, चार जखमींना हेलिकॅप्टरने पाठविले
गडचिरोलीतील जखमी जवानांवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Follow us on

नागपूर : गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जंगलात पोलीस आणि नक्षल चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या मोहिमेत हे जवान सहभागी झाले होते. या चारही जवानांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

दोघांची प्रकृती चिंताजनक

13 नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती ऑरेंज सिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी दिली. पोलीस जवान रवींद्र नेताम यांना कानावर आणि डोळ्यावर गोळी लागली. सर्वेश्वर आत्राम यांच्या पायाला जखम झाली. महरू कुडमेथे यांच्या गुडघ्याला, तर टीकाराम कटांगे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. डॉ. राजेश अटल यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांची एक चमू जखमींवर उपचार करीत आहे.

सकाळपासून दिवसभर सुरू होती चकमक

शनिवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली होती. ही चकमक संध्याकाळी साडेसहा वाजतापर्यंत सुरू होती. नक्षल्यांनी मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह बाजूच्या गावात ओढून नेल्याची माहिती आहे. घटनास्थळावरून हत्यार ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. मरदीनटोला जंगल परिसरात 150 ते 200 बंदुकधारी नक्षलवादी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले होते. सी-60 कमांडोच्या चमूने ही कारवाई केली. या घटनेमुळे नक्षली चळवळीला फार मोठा धक्का बसला आहे.

आतापर्यंतच्या मोठ्या नक्षली कारवाया

21 मे 2021 रोजी पयडी जंगल (एटापल्ली) 13 नक्षलवादी पोलिसांच्या चकमकीत ठार झाले. 13 मे 2021 रोजी मोरचुल जंगल (धानोरा) दोन नक्षलवादी ठार झाले. 28 एप्रिल 2021 रोजी गोरगट्टा जंगल (एटापल्ली) दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 29 मार्च 2021 रोजी मालेवाडा जंगलात (कुरखेडा) सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 25 एप्रिल 2018 रोजी कसनासूर बोरिया (एटापल्ली)येथे 39 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

वाचा संबंधित बातम्या :

गडचिरोली पोलिसांची नक्षलविरोधी मोठी कारवाई, चकमकीत मारला गेल्याची चर्चा असलेला मिलिंद तेलतुंबडे कोण?

Milind Teltumbde | पोलिसांच्या धुमश्चक्रीत मिलिंद तेलतुंबडे ठार?; गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठे कोम्बिंग ऑपरेशन