
मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. उद्या (शनिवार) गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे काही वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. 6 सप्टेंबर रोजी स्वराज्य भुमी गिरगांव चौपाटी या ठिकाणी भायखळा, नागपाडा, काळबादेवी, डि. बी. मार्ग वाहतूक विभागातून लालबाग राजा व इतर मोठ्या गणपती मुर्तीचे विसर्जन केले जाते. या अनुषंगाने दक्षिण वाहतूक विभागांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 सप्टेंबर 2025 (अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन) रोजी दुपारी १२.०० वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत महत्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. या काळात होणारी गैरसोय टाळण्याकरीता नागरीकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक म्हणजेच BEST Bus, लोकल ट्रेनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी तिनही मार्गावर लोकल ट्रेन रात्रभर चालू राहणार आहेत.
गणेश विसर्जन असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई परिसरात 6 सप्टेंबर रोजी सकाळी 7 पासून ते 7 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. या काळात उत्तर मुंबईतुन दक्षिण मुंबईत येणाऱ्या तसेच दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईमध्ये जाणाऱ्या वाहन चालकांनी जास्त कोस्टल रोडचा (धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) चा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फ्रि वे (विलासराव देशमूख पुर्व मुक्त मार्ग) / अटल सेतु कडून दक्षिण मुंबई मार्गे उत्तर मुंबई कडे जाण्यासाठी फ्री वे (विलासराव देशमूख पूर्व मुक्त मार्ग ) – पी. डिमेलो मार्ग -कल्पना जंक्शन उजवे वळण – भाटीया बाग जंक्शन -उजवे वळण सी.एस.एम.टी.जंक्शन – डावे वळण – महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन – उजवे वळण – श्यामलदास मार्ग – श्यामलदास जंक्शन डावे वळण- प्रिंसेस स्ट्रीट कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) उत्तर वाहिनीचा वापर करावा.
उत्तर मुंबईकडुन दक्षिण मुंबई मार्गे फि वे /अटल सेतुकडे जाण्या करीता वाहन चालकांनी कोस्टल रोड दक्षिण वाहिनी प्रिंसेस स्ट्रीट -उजवे वळण -श्यामलदास जंक्शन – श्यामलदास मार्ग -डावे वळण – मेट्रो जंक्शन महापालिका मार्ग – उजवे वळण सी.एस.एम.टी.जंक्शन डावे – वळण भाटीया बाग जंक्शन डावे वळण कल्पना जंक्शन पी.डिमेलो मार्ग – फ्री वे (विलासराव देशमूख पुर्व मुक्त मार्ग ) / अटल सेतु या दक्षिण वाहिनीचा वापर करावा.
मुंबई शहरात गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टि जंक्शन, पवई ( गणेश घाट ) या ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
1. नाथालाल पारेख मार्ग :- भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) ते सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) पर्यंतचा मार्ग वाहतुकीकरीतादोन्ही वाहिन्यांवर बंद राहील.
पर्यायी मार्ग :- भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) ते सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) कडे न जाता सदरची वाहतुक कॅ. प्रकाश पेठे मार्गाने झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेनजंक्शन) पासून पुढे इच्छित स्थळी जातील.
2. कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग – संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) ते झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन)पर्यंत उत्तर वाहिनी वाहतुकीकरीता बंद राहील.
पर्यायी मार्ग :- संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) ते झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन)कडे न जाता सदरची वाहतुक साधु टि.एल.वासवानी मार्गाने वर्ल्ड ट्रेड सेंटर, उजवे वळण मेकर टॉवर उजवे वळण जी. डी. सोमानी मार्गाने झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन) पासून पुढे इच्छित स्थळी जातील.
1. नेताजी सुभाषचंद्र बस मार्ग :- नेताजी सुभाषचंद्र बस मार्ग उत्तर संभाजी वाहीनी महाराज वरील सागरी वाहतुक आवश्यकतेनुसार इस्लाम जिमखाना पासुन छत्रपती मार्ग कोस्टल रोड मार्गे वळविण्यात येईल.
1 महानगरपालिका मार्ग – सी.एस. एम. टी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत वाहतुक (आवश्यकतेनुसार) प्रतिबंधित असेल.
पर्यायी मार्ग :- 6 सप्टेंबर रोजी सदरची वाहतुक ही सी.एस. एम. टी जंक्शन वरून डि. एन रोड एल. टी.मार्गे ते मेट्रो जंक्शन (वासुदेव बळवंत फडके चौक) अशी वळविण्यात येणार आहे.
1. जे. एस. एस. रोड – संगीतकार अब्दुल करीम खान चौक (अल्फ्रेड जंक्शन) ते समतानंद अनंत हरी गद्रे चौक (पोर्तुगीज चर्च) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग – वाहतुक महर्षी कर्वे मार्ग व एन एस रोड मार्गे वळविण्यात येईल.
2. विठ्ठलभाई पटेल मार्ग कस्तुरबा गांधी चौक (सी पी टॅक सर्कल) ते भगवान श्री चंद्रप्रभा चौक (हॉटेल नित्यानंद जंक्शन) हा रस्ता वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग – वाहतुक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
3. बाबा साहेब जयकर मार्ग – डॉ. चंद्रकला हाटेबाई चौक (घोडागाडी जंक्शन) ते डॉ. यशवंत सामंत चौक (खत्तर गल्ली नाका) दरम्यानची वाहतुक दिनांक ०६/०९/२०२५ रोजी अनंत चतुर्थी दिवशी वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग – वाहतुक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
4. राजा राम मोहन रॉय रोड चारुशीला गुप्ते चौक (चन रोड स्टेशन जंक्शन) ते पदमश्री गोवर्धन बाप्पा चौक (प्रार्थना समाज जंक्शन) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग – वाहतुक महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.