मोठी बातमी! कुख्यात गुंडाच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी, पुण्यातील प्रभाग क्रमांक 10 मधून..

महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. सर्वत्र धावपळ बघायला मिळतंय. सर्वांच्या नजरा या पुणे महापालिका निवडणुकीकडे आहेत. त्यामध्येच आता थेट कुख्यात गुंडाची पत्नी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

मोठी बातमी! कुख्यात गुंडाच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी, पुण्यातील प्रभाग क्रमांक 10 मधून..
Nationalist Congress Party
| Updated on: Dec 30, 2025 | 11:40 AM

आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पुण्यात भाजपा शिवसेना युती होणार की, नाही हे अजून स्पष्ट झाले नाहीये. सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून अजूनही एबी फॉर्मचे वाटत करण्यात आले नाहीये. जयश्री मारणे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक 10 मधुन उमेदवारी अर्ज भरणार आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जयश्री मारणेला एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. जयश्री मारणे प्रभाग क्रमांक 10 मधुन निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गजा मारणेच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने अनेकांना धक्का बसला. दुसरीकडे गुंड आंदेकरही निवडणुकीच्या मैदानात उतरले. गजा मारणे सध्या तुरूंगात असून त्याची पत्नी थेट महापालिका निवडणूक लढवत आहे.

कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात मारणे कारागृहात आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये काम पाहणाऱ्या व्यक्तीस मारहाण झाली होती. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करण्याऱ्या व्यक्तीला गजा मारणे याच्या टोळीकडून बेदम मारहाण झाली होती. मारहाण करणारे आरोपी जामिनावर सुटल्याची माहिती होते, त्यानंतर गजा मारणे टोळीविरोधात मुरलीधर मोहोल मैदानात उतरले होते.

मुरलीधर मोहोळ याच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्यानंतर गजा मारणे याची टोळी चांगलीच अडचणीत आली. गजा मारणे कारागृहात असताना आता त्याची पत्नी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. दुसरीकडे रुपाली पाटलांना प्रभाग 2 मधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. कसब्यातून प्रभात 25 अ शनिवार पेठ मंडई व प्रभाग 26 ब गुरुवार पेठ घोरपडी पेठ समता भूमी तुन 2 ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारी.

रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन एबी फॉर्म दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटील आणि रूपाची चाकणकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. रूपाली चाकणकर यांच्यावर गंंभीर आरोप करताना रूपाली पाटील दिसल्या. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट देखील या वादादरम्यान घेतली होती. आता रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन एबी फॉर्म पक्षाकडून देण्यात आली.