AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरीजा राऊतांचे गंभीर आरोप, आता प्रकरणात करुणा मुंडेंची एन्ट्री, विनायक राऊतांना केले तीन मोजके प्रश्न

विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यावर गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे राऊत कुटुंबीयाच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान यावर आता करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गिरीजा राऊतांचे गंभीर आरोप, आता प्रकरणात करुणा मुंडेंची एन्ट्री, विनायक राऊतांना केले तीन मोजके प्रश्न
करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 13, 2026 | 3:12 PM
Share

विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यावर गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. गिरीजा राऊत या विनायक राऊत यांच्या सून आहेत.  राऊत कुटुंबाकडून आपला मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप गिरीजा राऊत यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे विनायक राऊत यांनी गिरीजा राऊत यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  या आरोपांमागे षडयंत्र आहे, त्याचा सूत्रधार कोण आहे, याचे पुरावे मी आज देणार नाही, परंतु माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या प्रकरणात करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणावर बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे? 

प्रत्येक पुढारी तांत्रिक,  मांत्रिकाच्या नादी लागलेले असतात.  त्यांच्या सुनेला न्याय भेटला पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. विनायक राऊत यांनी म्हटलं की तिने पैशांची मागणी केली, परंतु तुम्ही त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. श्रीमंत लोकांना काय वाटतं? की महिलांचं आयुष्य फक्त असच असतं? काय विचार करून तुम्ही लग्न करता? असा थेट सवाल यावेळी करुणा मुंडे यांनी केला आहे.

तुम्ही माफी मागण्यापेक्षा सांगतात की लोन भरण्यासाठी पैशांची मागणी केली, मग याच्यामध्ये काय चूक आहे? आज मंत्रिमंडळामध्ये बसलेल्या एका एका आमदार, खासदारांना दोन -दोन तीन-तीन बायका आहेत, पण त्यावर कोणी बोलणार नाही. महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे, तिथे कोणीतरी बसवा, नाहीतर मला महिला आयोगाचे अध्यक्ष करा, मग मी बघा महिलांना कसा न्याय देते ते असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. पुढाऱ्यांमध्ये अंधश्रद्धा असते, एक खासदार, आमदार, नगरसेवक असा नाहीये, ज्याचा संबंध हा भोंदू बाबासोबत नाही. विनायक राऊत यांच्या सूनेला मी भेटणार आहे, असंही यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या.  दरम्यान सध्या राज्यासह देशात खासदार, आमदार फुटत आहेत, यावर देखील करुणा मुंडे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश