भाजपाच्या संकटमोचकांनी शिंदे, अजितदादा गटाचं टेन्शन वाढवलं, केलं मोठं वक्तव्य

भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बोलताना मोठा दावा केला आहे, यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या संकटमोचकांनी शिंदे, अजितदादा गटाचं टेन्शन वाढवलं, केलं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 15, 2025 | 3:48 PM

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. लवकरच या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी आप-आपल्या स्तरावर निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

स्थानिक स्वारज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत, याला एखादी -दुसरी जागा अपवाद असू शकते, तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल, मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय म्हणजे महायुतीच आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे. मात्र आता दुसरीकडे भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बोलतान महापालिका निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असल्याचं अनेक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही युतीमध्येच लढणार, पण  युती झाली तरी नाशिकमध्ये 100 पार, नाही झाली तरी 100 पार, असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाज यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.  दरम्यान पुढे बोलताना मी भाजपात सगळ्यात सिनियर आहे, सगळ्यात जास्त वेळेला निवडून आलो आहे.  मी पण साधा कार्यकर्ता होतो, असंही यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एकीकडे महायुतीमधील घटक पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्था या महायुती म्हणूनच लढवण्याचे संकेत मिळत आहेत, मात्र दुसरीकडे या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुका कशा लढवणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.