AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा देशामधला सगळ्यात मोठा विषय होऊ शकतो…, प्रांजल खेवलकर प्रकरणात आता महाजनांचा नवा बॉम्ब

प्रांजल खेवलकर प्रकरणावर बोलताना रुपाली चाकणकर यांनी गंभीर आरोप केले होते, त्यावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हा देशामधला सगळ्यात मोठा विषय होऊ शकतो..., प्रांजल खेवलकर प्रकरणात आता महाजनांचा नवा बॉम्ब
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2025 | 5:36 PM
Share

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, सध्या ते जेलमध्ये आहेत. दरम्यान या प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते.  खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत, या प्रकरणाचा महिलांची तस्करी या दृष्टीनेही तपास करावा, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?  

रुपालीताई चाकणकरांनी ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती मागितली त्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना ती माहिती दिली आणि त्यांनी ती जशीच्या तशी वाचून दाखवली आहे. मला वाटतं याबाबतीमध्ये आपण आता न बोललेलं बरं, पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. तपासांती खरं काय खोटं काय? ते समोर येईल. आताच आपण  सर्टिफिकेट देणे योग्य नाही.  जे मी ऐकलं, रुपाली चाकणकर यांनी जे सांगितलं, त्यावरून हा खूप मोठा विषय आहे. देशामधला सगळ्यात मोठा विषय होऊ शकेल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपकडून एकनाथ खडसे यांच्याविरोधार आंदोलन करण्यात आलं होतं, खडसे कुटुंबावर आरोप सुरू आहेत, यावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, असं यावेळी महाजन यांनी म्हटलं.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, रेव्ह पार्टीचा तपास पोलीस करत आहेत, आपण त्यात न बोललेलं बरं, याबाबतीत मला काही बोलायचं नाही, कुठलंही भाष्य करायचं नाही. कॅसेटमध्ये असेल किंवा मोबाईलमध्ये असेल काय असेल  पोलिसांच्या तपासात बाहेर येईल, त्यामुळे आता यावर आपण न बोललेलं बरं, असं महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या प्रांजल खेवलकर प्रकरणावरून जोरदार -आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा