Gokul President Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या सत्तास्थापनेत ट्विस्ट; सतेज पाटील यांना मोठा धक्का, महायुतीने नवा डाव टाकला?

Gokul president election : गोकुळ दूध संघाच्या सत्तास्थापनेत ट्विस्ट निर्माण झाला आहे. सतेज पाटील यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सत्तास्थापनेसाठी महायुतीने नवा डाव टाकल्याची चर्चा आहे.

Gokul President Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या सत्तास्थापनेत ट्विस्ट; सतेज पाटील यांना मोठा धक्का, महायुतीने नवा डाव टाकला?
gokul president election
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 9:13 AM

Gokul Election Result : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.  या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्यात. तर महायुतीच्या पॅनला 12 जागा मिळाल्या आहेत.  आता दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी 14 जणांच्या उपस्थितीचा कोरम महत्वाचा मानला जातो. परंतु कोरम न झाल्याने गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही, असं सांगण्यात येत आहे. याचदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.

गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तर गोकुळ दूध महासंघाच्या चार शासकीय सदस्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या शासकीय सदस्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाच्या अधिकाराबाबत वटहुकूम काढला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  गोकुळवर समविचारी आघाडीची सत्ता येऊ नये, यासाठी महायुती प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. शासकीय सदस्यांमध्ये शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफ आणि अशोक फराकटे यांच्या नावाची चर्चा झाल्याचे सांगण्यात आलं आहे. शासकीय सदस्यांची नावे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज मंगळवारी चर्चा करून सदस्यांचे नावे ठरवले जातील, असे सांगण्यात आलं आहे.

Loading...

गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सत्ताशसंघर्ष पेटल्याचे दिसत आहे. 13 विरुद्ध 12 या संख्याबळाच्या जोरावर समविचारी आघाडीने अध्यक्षांची निवड केल्याचा दावा आहे. अध्यक्षपदासाठी शशिकांत चुयेकर यांची निवड केल्याचं सांगण्यात आलंय. परंतु ही निवड बेकायदेशीर ठरू नये, यासाठी समविचारी आघाडीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी यासाठी सर्किट बेंचमध्ये धाव घेतलीये. आता या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान कोर्टानेच महायुतीच्या 12 संचालकांना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे ही निवड बेकायदेशीर असल्याचा आक्षेप महायुतीने घेतलाय.

अध्यक्षपदाच्या निवडीवरील सुनावणीदरम्यान कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये तीन तास दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. कोर्टात प्रकरण पोहोचल्यानंतर 13 संचालकांच्या उपस्थितीमध्ये कोरम पूर्ण होतो का,  अध्यक्ष निवड प्रक्रिया कायदेशीर होता का, यावर खडाजंगी झाली. आता कोर्टाने 10 नोव्हेंबर रोजी सभा घेऊन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळतेय.  आता या सभेला सर्व 25 संचालक उपस्थित राहणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे गोकुळचा अध्यक्ष कोण होणार, याचा फैसला 10 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us