नक्षलवाद्यांकडून ग्रामपंचायत निवडणूक उधळण्याचा डाव उघड, गोंदियात पुरुन ठेवलेली स्फोटकं जप्त

| Updated on: Jan 15, 2021 | 8:22 PM

ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सक्रीय झाल्याचं पाहायला मिळतंय. केशोरी पोलिसांनी गोंदियातील नक्षलावाद्यांचा असाच एक घातपाताचा डाव उधळला आहे.

नक्षलवाद्यांकडून ग्रामपंचायत निवडणूक उधळण्याचा डाव उघड, गोंदियात पुरुन ठेवलेली स्फोटकं जप्त
Follow us on

गोंदिया : ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सक्रीय झाल्याचं पाहायला मिळतंय. केशोरी पोलिसांनी गोंदियातील नक्षलावाद्यांचा असाच एक घातपाताचा डाव उधळला आहे. जिल्ह्यातील भरनोली जंगल परिसरात नक्षल्यांनी पुरून ठेवलेला स्फोटकांचा साठा केशोरी पोलीस आणि भरनोली सशस्त्र दूरक्षेत्र पोलिसांनी शोधून काढलाय. त्यामुळे नक्षलवाद्यांचे मनसुबे मो़डीत निघाले आहेत. पोलिसांनी आज (10 जानेवारी) ही कारवाई केली. तसेच अज्ञात नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय (Gondia Police action on Naxal Explosives amid Grampanchayat Election).

जिल्ह्यात 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे निवडणुका उधळून लावण्यासाठी नक्षलवाद्यांकडून जोरदार प्रयत्न होत आहे. म्हणूनच पोलीस आणि गृह विभाग नक्षवाद्यांची चळवळ हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रशासनाला त्यात यशही येताना दिसत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेता पोलिसांनी सतर्कतेच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. रविवारी (10 जानेवारी) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत भरनोलीचे सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस गस्तीवर होते. दरम्यान ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी कट रचला होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम राबवत ही कारवाई केली.

शोध मोहिमेत पोलिसांना बोरटोला ते धानोरी पहाडीच्या ऊतार भागात दगडाच्या बाजूला काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. यानंतर प्राथमिक तपास करुन श्वान पथक आणि बी़डीडीएस पथकाला पाचारण करण्यात आलं. या पथकांच्या पाहणीत जर्मनच्या 10 किलोच्या डब्यात लोखंडी खिळे, काच, वायर आणि काळी स्फोटक पावडर आढळून आली. पोलिसांनी संबंधित स्फोटकं जप्त केली आहेत. तेसच अज्ञात नक्षलवाद्यांविरोधात केशोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

डोक्यावर 12 लाखांचं बक्षीस, जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला 10 वर्षांनी अटक

पोलिसांसह सी-60 कमांडोंची नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, गडचिरोलीतील कॅम्प उद्ध्वस्त

नक्षलविरोधी कारवाईला मोठं यश, जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला बेड्या

Gondia Police action on Naxal Explosives amid Grampanchayat Election