रसायन वापरून तयार केली जात होती दारू, पोलिसांची मोठी कारवाई

| Updated on: Oct 05, 2022 | 6:49 PM

या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने या आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रसायन वापरून तयार केली जात होती दारू, पोलिसांची मोठी कारवाई
Follow us on

शाहिद पठाण,TV9 मराठी, प्रतिनिधी, शाहिद पठाण, गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या खातिया येथील एका कारखान्यावर रावणवाडी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त केला. दारू तयार करण्याचे साहित्य सुद्धा जप्त केले. त्यात दारू तयार करण्यास लागणारे रसायन वापरलं जात होतं. ही रसायनयुक्त दारू प्यायल्यानं लोकांना विषबाधा देखील होऊ शकते. स्पिरीट, अल्कोहोलचे रंग फ्लेवर मिक्स केले जात होते. बाटलीत भरून बनावट लेबल लावले जात होता. त्यानंतर ही विषयुक्त दारू विक्री करीत असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली.

पाच आरोपींना अटक

खातिया येथील सुभाषचंद पालीवाल यांच्या घरात बनावट दारू तयार केली जाते. त्यानंतर या बनावट दारूची बाजारात विक्री करीत असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळाली. रावणवाडी पोलिसांनी धाड टाकून 3 लाख 13 हजार 829 रुपयाचा माल जप्त केला.

या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने या आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशी आहेत आरोपींची नावं

जानकी हॉस्पिटलच्या बाजूला राहणारे सुभाष रामचंद्र पालीवाल (वय 48), राजेश सुनील यादव (वय 28), मरारटोलीतील संदीप आमोद चंद्रिकापुरे (वय 23), चंद्रशेखर वॉर्डातील राजेश टेंभुर्णे (23) व कामठा येथील प्रकाश गोवर्धन अग्रवाल (47) अशी आरोपींची नावं आहेत.

या आरोपींवर भादंविच्या कलम ३२८ भांदवी सहकलम ६५ (ब) (क) (ड) (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश आहे. ते फरार असल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी आरोपींचा पीसीआर मागण्यात आला आहे.