या जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर…

| Updated on: Apr 05, 2023 | 10:49 PM

एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतानाच दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

या जिल्ह्यात आज कोरोनाचा गेला पहिला बळा; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर...
Follow us on

गोंदिया : देशाची राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच आता वेगवेगळ्या राज्यातही प्रचंड वेगाने कोरोनाचा प्रसार होतो आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असून काही राज्यातून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता लोकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतानाच दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याने प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे कोरोनाने आता पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनाकडून उपचार आणि इतर सोयींसाठी जय्यत तयारी केली जात आहे.

राज्यात पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे आता गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचा पहिला बळी गेल्याने जिल्हा हादरला आहे.

कोरोनाचा एक रुग्ण दगावला असून त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आणखी पाच रुग्म आढळून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा खबरदारी घेण्याचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असल्याने आता भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी एक महिला रूग्ण आयसीयूमध्ये दाखल करण्यात आली होती.

त्या महिलेचा आज सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.तर आज 5 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असूनआतापर्यंत रुग्ण 46, 833 आतापर्यंत डिस्चार्ज होऊन घरी गेले आहेत.

तर आता पर्यंत जिल्ह्यात एकून 590 रुग्णांचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला आहे. आज ज्या महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे ती महिला गोंदिया तालुक्यातील असून जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे.