Gondia : गोंदियात शेळीचोरांची दहशत, चोर समजून दोन युवकांना गावकऱ्यांनी दिला चोप

| Updated on: Sep 01, 2022 | 7:00 PM

अनोळखी व्यक्तीला मारहाण करत आहेत. सुरुवातीला त्याला हातांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर काठी घेऊन त्याला मारहाण करण्यात येत आहे.

Gondia : गोंदियात शेळीचोरांची दहशत, चोर समजून दोन युवकांना गावकऱ्यांनी दिला चोप
चोर समजून दोन युवकांना गावकऱ्यांनी दिला चोप
Image Credit source: t v 9
Follow us on

गोंदिया : चोर समजून दोन युवकांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप (beating youths) दिला. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी बाम्हणी गावात घडली. अखेर डुग्गीपार पोलिसांना (Duggipar Police) स्वाधीन केले. त्यानंतर गावकरी निघाल्याने पोलिसांनी त्यांना सोडले आहे. या मारहाणीचा व्हिडीयो प्रचंड वायरल होत आहे. खडकी बाम्हणी गावात मागील 10 दिवसांपासून शेळ्या चोरीच्या (goat thieves) घटना सुरू आहेत. गावकरी दहशतीमध्ये आहे. त्यामुळे गावात अनोळखी व्यक्ती आला की, त्यांची विचारपूस केली जात असे. मात्र, काल गावात दोन अनोळखी व्यक्ती आले होते. उचित उत्तर मिळाले नाही. गावकऱ्यांना हिचं व्यक्ती शेळ्या चोर असल्याचा संशय आला. दोन्ही व्यक्तींना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. त्यांनतर डुग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आता हे मारहाणीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. त्यामुळं याची चौकशी पोलीस करीत आहेत.

व्हिडीओत नेमकं काय?

एका व्हिडीओत गावातील लोकं एकत्र आली आहेत. अनोळखी व्यक्तीला मारहाण करत आहेत. सुरुवातीला त्याला हातांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर काठी घेऊन त्याला मारहाण करण्यात येत आहे. तो स्वतः मी निर्दोष असल्याचं सांगत आहे. पण, लोकं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. दुसऱ्या व्हिडीओत दुसरा एक आरोपी आहे. त्याला चपलेनं मारहाण करण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही संशयितांना चांगलंच बदडत आहेत.

संशयितांवर आरोप काय?

डुग्गीपार पोलीस ठाण्याअंतर्गत खडकी बाम्हणी गाव येते. या गावात काही दिवसांपासून शेळ्यांची चोरी केली जात आहे. शेळ्या गायब होत आहे. कोणीतही त्यांची विल्हेवाट लावत आहे. त्यामुळं शेळ्यांचे मालक परेशान आहेत. या चोरांचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण, चोर काही सापडत नाहीत. काल दोन संशयित गावात फिरत होते. हेच ते शेळ्या चोरणारे असावेत, असा गावकऱ्यांना संशय आला. गावकऱ्यांनी त्यांचा चांगलेच बदडले. त्यानंतर पोलिसांना कळविलं. पोलीस आले. त्यांना घेऊन गेले. पण, चौकशीत ते चोर नसल्याचं पोलिसांना वाटलं. त्यामुळं त्यांना सोडण्यात आलं. पण, त्यांच्या मारहाणीचा व्हि़डीओ चांगलाच व्हायरल झाला.

हे सुद्धा वाचा