Weather Update : मळभ सरलं, महाराष्ट्रात पाऊस परतणार या दिवसापासून धो-धो बरसणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाने दडी मारली, पाऊस झाला नाही. पावसाभावी पिकं सुकून चालली आहेत. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतु आता शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (Weather expert Punjabrao Dakh) यांचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे.

Weather Update : मळभ सरलं, महाराष्ट्रात पाऊस परतणार या दिवसापासून धो-धो बरसणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 7:31 PM

महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाने दडी मारली होती, त्यामुळे यंदा खरीप हंगामातील पेरण्या या उशिराने म्हणजे जुलै महिन्यात झाल्या, दरम्यान त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने ऐनवेळी धोका दिला, त्यामुळे पिकं संकटात सापडली आहेत. पावसामध्ये प्रदिर्घ खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतु आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात दडी मारून बसलेल्या पावसाचं सप्टेंबर महिन्यात जोरदार आगमन होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे, याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी माहिती दिली आहे.

काय आहे नवा पावसाचा अंदाज?

राज्यात एक आणि दोन तारखेला काही भागांमध्ये जसं की सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, बारामती, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, पंढरपूर, या परिसरामध्ये एक आणि दोन सप्टेंबर तसेच सहा, सात आणि आठ सप्टेंबर रोजी या भागात पाऊस होणार आहे. या पावसामुळे या भागातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. या भागात खूप मोठा पाऊस पडणार नाही. मात्र एवढा पाऊस नक्की पडेल ज्यामुळे शेतातून पाणी बाहेर निघेल. काही ठिकाणी पेंड वळता पाऊस पडेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज डख यांनी वर्तला आहे.

दरम्यान या काळात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे, घाट माथा आणि कोकणातही पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरपासून ते पालघरपर्यंत पाऊस होईल या पट्ट्यांमध्ये येणाऱ्या जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील पिकांना जीवदान मिळणार आहे. दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. बीड, जालना या दोन जिल्ह्यांमध्ये याच काळात पाऊस हजेरी लावेल, ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली मात्र सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल, चार तारखेच्या मध्यरात्रीपासून विदर्भात पावसाचा जोर वाढेल, नागपूर गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल असा हवामान अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us