AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला धक्का, माजी नगराध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश

Raigad Politics : रायगडच्या रोह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. एका माजी नगराध्यक्षाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला धक्का, माजी नगराध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश
NCP Leader Join Shivsean in RaigadImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 01, 2026 | 7:32 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. सुरुवातीला शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले होते. आगामी काळात मोठ्या प्रमाणात निवडणुका नसल्या तरी आताही मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. रायगडच्या रोह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. एका माजी नगराध्यक्षाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. रोहा शहराचे माजी नगराध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय असलेले संतोष पोटफोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालकमंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी संतोष पोटफोडे यांच्यासह रोहा शहर आणि परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

रोहा हा तटकरे कुटुंबाचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत तटकरे यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या माजी नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिंदेसेनेत प्रवेश केल्याने हा सुनील तटकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. पोटफोडे यांच्या पक्षप्रवेशामुळे रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश शिंदेसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात असून, रोह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोटफोडे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केल्याने रोह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा ठरू शकतो. तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेनेने केलेल्या या राजकीय खेळीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,