मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी, सरकारचा मोठा निर्णय, घडामोडींना वेग
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. हे उपोषण निर्णयाक असेल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे, तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन करणार असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सरकारला 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. दरम्यान त्यानंतर आता सरकार दरबारी हालचाली वाढल्या असून, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यानंतर अखेर आता सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शुभराज देसाई, मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांचा समावेश असणार आहे. दरम्यान या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा होणार? या आंदोलनावर काही तोडगा निघणार की आंदोलन सुरूच राहणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जरांगे पाटलांकडून मुंबईत आंदोलनाचा इशारा
आपल्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सरकारला इशारा देताना 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. जर 15 दिवसांमध्ये सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या 12 तारखेला महाराष्ट्रातील मराठा बांधवांची एक बैठक बोलावली जाईल, आणि या बैठकीत मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच हे आदोलन निर्णायक आंदोलन आहे, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारदरबारी हालचालींना वेग आला आहे. उद्या सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शुभराज देसाई, मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे.