AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

आजच्या लेखात आपण घरच्या घरी पिस्त्यापासून कुंडीत रोप तयार करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. यासोबतच रोपाची योग्य वाढ होण्यासाठी पाणी, सूर्यप्रकाश, माती आणि खताची काळजी कशी घ्यावी? याबाबतचे महत्त्वाचे टिप्सही जाणून घेऊयात.

घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा
pistachioImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Aug 30, 2026 | 8:34 PM
Share

बाजारात सुकामेवा खरेदी करणे अनेकांच्या खिशाला चांगलेच महागात पडते. मग ते बदाम असो वा काजू किंवा पिस्ता, या सर्वांची किंमत दिवसेंदिवस वाढताना दिसते. त्यात पिस्ता हा अनेकांचा आवडता सुकामेवा असला, तरी त्याची किंमत पाहून अनेकजण तो खरेदी करण्यापूर्वी विचार करतात. बाजारात पिस्त्याची किंमत साधारण 400 ते 1600 रुपये प्रति किलो इतकी असू शकते. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की पिस्त्याचे रोप तुम्ही घरच्या घरीही लावण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या घरात असलेल्या पिस्त्यांपासूनच पिस्त्याचे रोप तयार करता येऊ शकते. सुरुवातीला ही प्रक्रिया थोडी अवघड वाटू शकते. मात्र योग्य पद्धत आणि थोडा संयम ठेवला, तर कुंडीत पिस्त्याचे रोप वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करता येतो.

मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे पिस्त्याचे रोप लावल्यानंतर लगेच काही महिन्यांत पिस्ते मिळतील, अशी अपेक्षा ठेवू नका. या झाडाला वाढण्यासाठी आणि फळधारणेसाठी बराच वेळ लागतो. मग घरच्या पिस्त्यापासून रोप कसे तयार करायचे? कुंडी, माती आणि पाण्याची किती गरज असते? तसेच रोपाची योग्य काळजी कशी घ्यायची? चला जाणून घेऊया पिस्त्याचे रोप वाढवण्याची सोपी पद्धत आणि त्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या गोष्टी.

सर्वप्रथम योग्य पिस्ते निवडणे महत्त्वाचे आहे

पिस्त्याचे रोप लावण्यासाठी बाजारात मिळणारा कोणताही पिस्ता वापरता येत नाही. रोप तयार करण्यासाठी कच्चे आणि मीठ नसलेले पिस्ते निवडणे महत्त्वाचे आहे. भाजलेले, तळलेले किंवा मीठ लावलेले पिस्ते लागवडीसाठी योग्य ठरत नाहीत. कारण प्रक्रियेमुळे त्यांच्या बियांमधील उगवण क्षमता कमी किंवा नष्ट होऊ शकते. म्हणूनच घरच्या घरी पिस्त्याचे रोप लावण्याचा विचार करत असाल, तर योग्य प्रकारचे पिस्ते निवडणे हीच पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

पिस्त्याचे रोप लावण्याची सोपी पद्धत

बिया निवडा: ताज्या, कच्च्या आणि मीठ नसलेल्या पिस्त्यांच्या अनेक बिया घ्या. पाण्यात भिजवा: बिया साधारण 24 तास सामान्य तापमानाच्या पाण्यात भिजत ठेवा.

कोंब फुटू द्या: बिया किंचित ओलसर कापडात किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. काही दिवसांनी मूळ किंवा कोंब दिसू लागल्यावर पुढची प्रक्रिया करा.

कुंडीत लावा: पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रे असलेली कुंडी घ्या. चांगला निचरा होणारी माती वापरून कोंब आलेल्या बिया 1–2 इंच खोल मातीत लावा.

सूर्यप्रकाश द्या: कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे रोपाला दररोज पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल.

पाणी जपून द्या: माती कोरडी वाटल्यावरच पाणी द्या. कुंडीत पाणी साचू देऊ नका.

रोपाची काळजी घ्या: रोप मोठे झाल्यावर गरजेनुसार मोठ्या कुंडीत हलवा आणि वेळोवेळी सेंद्रिय खत द्या.

प्रत्येक बी रुजेलच असे नाही, त्यामुळे सुरुवातीला अनेक बियांपासून प्रयत्न करणे चांगले. तसेच पिस्त्याच्या झाडाला फळधारणेसाठी बराच काळ लागू शकतो.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती