सरकारचा सर्वात मोठा निर्णय! शहरात प्रत्येक घराला आता डिजिटल कार्ड, जमिनाचा वाद कायमचा मिटणार

राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जमिनीच्या अधिकार अभिलेखांसाठी आता स्वतंत्र डिजिटल कार्ड निर्माण केले जाणार आहे. राज्यातील जमिनीच्या नोंदणी आणि मालकी हक्कांच्या अभिलेखांमध्ये मोठा बदल करण्याची तयारी सरकार करत आहे.

सरकारचा सर्वात मोठा निर्णय! शहरात प्रत्येक घराला आता डिजिटल कार्ड, जमिनाचा वाद कायमचा मिटणार
digital card for city apartments
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 2:39 PM

Digital Card for Apartment : जमीन आणि घराच्या मालकी हक्काचे वाद मिटावेत आणि भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारने याआधी बरेच महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. जमिनीचे व्यवहार सोपे व्हावेत म्हणून काही कालबाह्य नियम आणि कायदे रद्दबातल करण्याचेही धाडसी निर्णय सरकारने घेतलेत. दरम्यान, आता नवे तंत्रज्ञान आणि एआयच्या मदतीनेही सरकार जमीन व्यवहार नोंदणी तसेच घराची मालकी ठरवण्यासाठी काही नवे नियम तयार करत आहे. याच मोहिमेअंतर्गत सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय. शहरी भागात आता प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र डिजिटल कार्ड दिले जाणार आहे. तसा निर्णय सरकारने घेतलाय.

सरकारचा नेमका निर्णय काय?

जमिनीच्या अधिकार अभिलेखांसाठी आता स्वतंत्र डिजिटल कार्ड देण्याचा सरकारने निर्णय घेतलाय. राज्यातील जमिनीच्या नोंदणी आणि मालकी हक्कांच्या अभिलेखांमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. या बदलाअंतर्गत प्रत्येक पात्र सदनिकाधारकाला स्वतंत्र पूरक अधिकार अभिलेख देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. ग्रामीण भागातील जमिनींसाठी 7/12 उताऱ्याप्रमाणेच नगर भूमापन क्षेत्रातही स्वतंत्र नोंदीची व्यवस्था केली जाणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत इमारतीतील सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवही तयार करण्यासाठी 2026 चे नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत.

Loading...

30 दिवसांत हरकती, सूचना पाठवण्याचे आवाहन

या प्रस्तावअंतर्गत सदनिकेचा क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क, बोजे आणि सामाईक क्षेत्राची स्वतंत्र नोंद होणार आहे. मसुदा नियमांवर 30 दिवसांत हरकती व सूचना मागविणे, त्यानंतर नियम अंतिम करून प्रायोगिक अंमलबजावणीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

डिजिटल कार्ड कसे असणार हे अस्पष्ट

दरम्यान, या निर्णयामुळे सदनिका मालकांची आपल्या मालकी हक्काबाबतची चिंता मिटण्याची शक्यता आहे. हे डिजिटल कार्ड कसे असेल, त्यामध्ये नेमकी काय काय नोंद असेल. तसेच हे कार्ड काम कसे करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता भविष्यात सरकार या डिजिटल कार्डमध्ये कशा-कशाचा समावेश करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us