
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्ग येऊन देशात एक वर्ष होत आहे. मात्र कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. कोरोनाचे संकट कधीपर्यंत चालेल हे आज कुणीही खात्रीने सांगू शकत नाही. यामुळे सर्व नागरिकांनी कोरोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. (Governor Bhagat Singh Koshyari Comment on Corona Patient)
सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने करोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने राजभवन येथे विविध क्षेत्रातील 35 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या देशभरातील केसेस एकेवेळी दिवसाला 95000 होत्या. त्या आता 15000 पेक्षा कमी झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र, केरळ यांसह काही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे याकडे लक्ष वेधून केरोनासंदर्भात बेफिकीरीने न राहता सावधगिरी बाळगून निर्भयतेने काम करण्याची सूचना राज्यपालांनी केली.
जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची तसेच बळींची संख्या कमी होती. देशातील समाजसेवक, शासकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मी यांनी कोरोना काळात अतिशय सुंदर काम केले. त्यांना देशातील दानशूर व्यक्तींनी चांगले सहकार्य केले. त्यामुळेच भारत कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करू शकला, असे राज्यपालांनी सांगितले.
आवश्यक तिथं कंटेन्मेंट झोन तयार करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी दिले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत.
कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत वाढता कोरोना, रुग्णसंख्या, मृत्यूदर यांसह इतर गोष्टींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. (Governor Bhagat Singh Koshyari Comment on Corona Patient)
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही? वाढत्या कोरोनावर मुख्यमंत्र्यांचे 6 मोठे निर्णय