kolhapur Crime:लाच स्विकारताना जीएसटी अधीक्षक, निरीक्षक सीबीआयच्या जाळ्यात; अधिकारी, व्यापारीवर्गात खळबळ

| Updated on: Apr 29, 2022 | 9:44 PM

लाच लवकर दिली तर हे प्रकरण लवकर निकाली काढू असेही या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. अधिकाऱ्यांच्या या लाचेच्या मागणीला तक्रारदार व्यक्ती कंटाळली होती. त्यामुळेच त्यांनी पुढे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. 

kolhapur Crime:लाच स्विकारताना जीएसटी अधीक्षक, निरीक्षक सीबीआयच्या जाळ्यात; अधिकारी, व्यापारीवर्गात खळबळ
Image Credit source: TV9
Follow us on

जयसिंगपूर : सेवा कर दायित्वाबद्दल (Service tax liability) प्रकरण निकालात काढण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच घेताना जयसिंगपूर येथील केंद्रीय जीएसटी (GST) विभागाच्या अधीक्षकासह एका निरीक्षकाला सीबीआयच्या (CBI) लाचलुचपत विभागाने अटक केली. अधीक्षक महेश नेसरीकर व निरीक्षक अमित मिश्रा अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे अधिकारी आणि व्यावसायिकवर्गात खळबळ उडाली आहे.

50 हजारच्या तडजोडीवर येऊन थांबले

या प्रकरणातील तक्रारदाराने 2017-18 ते 2020-21 मधील सेवा कर दायित्वाबद्दल प्रकरण निकालात काढण्यासाठी अर्ज केला होता. ज्यावेळी अर्ज करण्यात आला त्यानंतर काही दिवासांनी तक्रारदार व्यक्तीकडे लाच मागण्यात येऊ लागली. लाच मागितल्यानंतर हे प्रकरण 50 हजारच्या तडजोडीवर येऊन थांबले होते.

पैसे लवकर द्या प्रकरण मिठवून टाकू

लाच लवकर दिली तर हे प्रकरण लवकर निकाली काढू असेही या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. अधिकाऱ्यांच्या या लाचेच्या मागणीला तक्रारदार व्यक्ती कंटाळली होती. त्यामुळेच त्यांनी पुढे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

फक्त पैशाची मागणी

तक्रारदार व्यक्तीकडे सेवा कर दायित्वाबद्दलचे प्रकरण निकालात काढण्यासाठी त्यांच्याकडे कायम लाच मागण्यात येऊ लागली. म्हणून तक्रारदार व्यक्तीने याबाबतची तक्रार सीबीआयच्या लाचलुचपत विभागाला या घटनेची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर सापळा रचून अधीक्षक व निरीक्षक यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आले. या कारवाईमुळे जीएसटी विभाग व व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

व्यापारी वर्गात समाधान

या घटनेमुळे आणि कारवाईमुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लाच मागण्याच्या या त्रासाला अनेक जण कंटाळले होते. त्यामुळे या प्रकरणात आता कारवाई झाली असल्याने जीएसटी विभागासह व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.