AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बामणोली ड्रग्ज प्रकरण तापलं, हर्षवर्धन सपकाळांच्या गौप्यस्फोटानंतर आता शुभराज देसाई मैदानात, दिला मोठा इशारा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, एकनाथ शिंदे यांच्या शेताशेजारी ड्रग्जजी फॅक्टरी सापडल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. यावरून त्यांनी काही आरोप देखील केले आहेत, त्याला आता शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बामणोली ड्रग्ज प्रकरण तापलं, हर्षवर्धन सपकाळांच्या गौप्यस्फोटानंतर आता शुभराज देसाई मैदानात, दिला मोठा इशारा
Harshvardhan SapkalImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 3:45 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, एकनाथ शिंदे यांच्या शेताशेजारी ड्रग्जची फॅक्टरी सापडल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत, ते त्यांच्या शेतात जातात, त्या शेताच्या शेजारी एक ड्रग्जची फॅक्टरी सापडली आहे. या फॅक्टरीमध्ये 42 लोक होते, त्यामध्ये दोन जणांना पकडलं. बाकीचे कुठले होते, बांग्लादेशी होते की, आणखी कुठले होते ते माहीत नाही. या आरोपींना सोडण्याकरता थेट उपमुख्यमंत्री कार्यालयातून व्हाया मुख्यमंत्री फोन गेले होते, असा गौप्यस्फोट हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की ते एरवी लुटुपुटूच्या लाढाया करतात. मात्र अशा प्रकारची कॅलॅमिटी आल्यानंतर ते तिघे पुन्हा एकत्र होतात, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये शिंदे सेनेचा हात असल्याची शंका आहे, ती चुकीची नाही, असं यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ड्रग्ज प्रकरणात केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. चौकशीनंतर कारवाई करणार असा इशाराही यावेळी शंभूराज देसाई यांनी दिला आहे. बामणोली ड्रग्ज प्रकरणातील आरोप हे निराधार आहेत, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

 नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई 

यामध्ये जे कोणी दोषी असतील, ते दोषी सापडतील, पोलीस त्याचा तपास करतील. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातील. मीडियामध्ये चमकण्यासाठी हर्षवर्धन सापकाळ यांच्याकडून हे निराधार आरोप करण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं किंवा त्यांच्या कार्यालयाचं नाव घेतलं की हर्षवर्धन सपकाळ यांचा चेहरा दिवसभर मीडियामध्ये दिसणार. अन्यथा त्यांचा चेहरा तसाही महिना महिना मीडियावर दिसत नाही. कारण त्यांचं काही कामच नाही ना, त्यामुळे आपला चेहराही दिसावा यासाठी चालेली ती त्यांची धडपड आहे, असं यावेळी शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!