‘गोकुळ’मध्ये मोठा उलटफेर होणार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दाव्याने खळबळ

गोकुळमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

गोकुळमध्ये मोठा उलटफेर होणार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दाव्याने खळबळ
Hasan mushrif
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 10:55 AM

गोकुळ दूध महासंघाच्या अध्यक्ष निवडीवरून मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे सतेज पाटील यांच्यासमोर अध्यक्ष निवडीच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.  त्यामुळे सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यात सरकारने चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळ हातातून जाणार, अशी भीती सतेज पाटील यांना सतावू लागली आहे. सतेज पाटील हे त्यांच्या समविचारी आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न करत आहेत. या घडामोडीदरम्यान हसन मुश्रीफ यांनी मोठा दावा केला आहे. गोकुळमध्ये सतेज पाटील यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला द्यावा, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं. हसन मुश्रीफ यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं भाष्य केलं. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,   ‘गोकुळबाबत राज ठाकरे यांना माहिती नाही. मी अनेक वेळा सांगितलं आहे. मी ट्रोल होत आहे, हे मला माहीत आहे. विशिष्ट परिस्थिती गोकुळमध्ये तयार झाली आहे. काँग्रेसचे 13 आणि महायुतीचे 12 निवडून आले. तर कोरम 14 चा आहे. गोकुळ महासंघाचा कोरम हा 14 चा असतो. त्यांचा एक संचालक कमी असल्याने कोरम पूर्ण होत नाही. आमच्याकडे 12 संचालक असल्याने दोन कमी पडत आहे.  आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या निवडणुकीच्या नियमानुसार तीन बैठकीत कोरम झाला नाही, तर प्रशासकच राहणार आहे. प्रशासक नेमल्यानंतर पुन्हा निवडणूक होणार आहे. निवडून आलेल्यांना सत्ता द्यायची असेल. त्यांना काम करू द्यायचे असेल. लोकशाही टिकवण्यासाठी दुसरा मार्ग होता. आता म्हणाल, तुमचे लोक अध्यक्ष निवडीसाठी का जात नाहीत? आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे. मग आमचे लोक त्यांचा अध्यक्ष निवडण्यासाठी कशाला जाईल. कायद्यात सरळ सरळ 14 चा कोरम आहे. त्यामुळे हा डेडलॉक तयार झाला आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाही’.

Loading...

‘तीन बैठकीत कोरम झाला नाही. प्रशासक आल्यानंतर…. आता प्रशासक कोणाला करायचं, हे सरकारच्या मनात आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. बहुमत मिळालं. पण आकडा गाठू शकले नाहीत. त्यांना सुदैवाने साथ दिली नाही. त्या 25 लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी आणि डेडलॉक संपवण्यासाठी, कारभार सुरू करण्यासाठी शासनाने एक निर्णय घेतला. शासननियुक्त संचालक कायद्याच्या चौकटीत टिकणार का? यात वेगवेगळी बाब आहे. समजा कयद्याच्या चौकटीत टिकलं नाही. पुढे सरकारवर अवलंबून आहे. जर सतेज पाटील यांना समविचारी आघाडीच्या माणसाला अध्यक्ष करायचा असेल, तर त्यांनी फॉर्म्युला दिला पाहिजे. त्यांनी निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री, तिन्ही मंत्री, आमदारांच्या फोटोचे काय काय पोस्टर लावले. मुख्यमंत्र्यांची देखील बदनामी केली. जय-पराजय होत असतात. परंतु माझ्या मुलाबाबतची कृती जिव्हारी लागली. त्यांनी थेट जातीयवादी प्रचार केला.  आता पेच संपल्यावर 25 लोक एकत्र बसून कारभार होईल. सतेज पाटील यांना अपेक्षित कारभार होईल. परंतु अजून सर्व ठरायचं आहे, असे पुढे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us