Hasan Mushrif : आम्ही बी टीम आणि शरद पवारांची राष्ट्रवादी..अंजली आंबेडकरांच्या आरोपावर हसन मुश्रीफ काय म्हणाले?

Hasan Mushrif : "त्या वेळेस ते आमच्या पक्षावर टीका करत होते, म्हणून उत्तर देताना आम्ही म्हणायचो अजित पवारांची जागा घेण्याची रोहित पवारांना घाई झाली आहे. आता ज्या पद्धतीने ते पुढे येत आहेत, स्पेस निर्माण करतायत"

Hasan Mushrif : आम्ही बी टीम आणि शरद पवारांची राष्ट्रवादी..अंजली आंबेडकरांच्या आरोपावर हसन मुश्रीफ काय म्हणाले?
Hasan Mushrif
| Updated on: Nov 24, 2026 | 11:32 AM

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रोहित पवार यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे. नागपुरात रोहित पवारांनी विधान भवनावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केलं. परंतु या मोर्चावरून खासदार सुप्रिया सुळे नाराज झाल्याचे समोर आलं आहे. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ यावर बोलले आहेत. “ज्या पद्धतीने रोहित पवार आक्रमकरित्या काम करत आहेत, त्यांची भूमिका स्पष्ट आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा देणाऱ्या सुप्रिया ताईंना त्यांचा विरोध आहे. प्रत्येक आंदोलन करताना पक्षाला विश्वासात घेऊन ते आंदोलन करत नाहीत अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. हा त्यांच्या पक्षातंर्गत विषय असल्यामुळे मी त्यावर बोलणं उचित होणार नाही” असं हसन मुश्रीफ म्हणाले.

रोहित पवारांना अजित पवारांची जागा घेण्याची घाई झाली आहे यावर हसन मुश्रीफ बोलले की, “त्या वेळेस ते आमच्या पक्षावर टीका करत होते, म्हणून उत्तर देताना आम्ही म्हणायचो अजित पवारांची जागा घेण्याची घाई झाली आहे. आता ज्या पद्धतीने ते पुढे येत आहेत, स्पेस निर्माण करतायत त्यावरुन त्यांचा हेतू स्पष्ट होतो”

Loading...

सुप्रिया ताईंची भूमिका स्वागतार्ह

“सुप्रिया ताई डिलिमिटेशनला पाठिंबा देतायत, तर त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. सुप्रियाताईंचा मतदारसंघ एवढा मोठा आहे की, पाच वर्ष त्या एक-एका गावात जाऊ शकत नाहीत. मतदारसंघ लहान होणार असेल , ते बिल अजून आलेलं नाही. एनडीए नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाली असेल, तर डिलिमिटेशनबद्दल त्यांची भूमिका स्वागर्ताह आहे. आमचे विधानसभेचे मतदारसंघ मोठे आहेत. विधानसभेत आजऱ्याला माझं शेवटचं गाव आहे. कागल कुठं आणि आजरा कुठं. लोकसंख्या मर्यादीत होणार असेल तर लोकप्रतिनिधींना सुद्धा प्रभावीपणे काम करता येईल. सुप्रिया ताईंची भूमिका स्वागतार्ह आहे” असं हसन मुश्रीफ म्हणाले.

अंजली आंबेडकरांच्या आरोपावर काय म्हणाले?

अंजली आंबेडकर म्हणाल्या की आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर आम्हाला भाजपची बी टीम म्हटलं जातं. पण तेच शरद पवार, त्यांची राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देत असेल तर त्यांना कुणी असं म्हणत नाही. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले की, ‘एका विशिष्ट प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली आहे’

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us