पहिल्या पावसातच भीमा नदीला पूर, पाभे गावाचा संपर्क तुटला

राज्यात गेल्या आठवड्यापासून प्रचंड पाऊस सुरु आहे. रविवारी पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत अतिमुसळधार पाऊस झाला. बारामती तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला. खेड तालुक्यातील भीमाशंकर येथे जोरदार पाऊस झाला.

Jitendra Zavar | Updated on: May 26, 2025 | 8:56 AM
1 / 5
पुण्याच्या भीमाशंकर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. खेड तालुक्यातील पाभे गावाचा संपर्क तुटला आहे. या भागात रात्रभर झालेल्या पावसानंतर पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

2 / 5
पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर या तीन तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसात जनावरे वाहून गेली असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी दिली.

3 / 5
बारामतीमधील काटेवाडी परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिंपळी -लिमटेक भागातील कॅनॉलला भगदाड पडल्याने पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमधील माती देखील या पावसामध्ये वाहून गेली आहे.

4 / 5
बारामती तालुक्यातील नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. त्यांनी नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतीच्या बांधावर पोहचत अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. शासनाकडून मदतीचे आश्वासन दिले.

5 / 5
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. बारामतीमधील इमारतींना भेगा पडल्या आहेत. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us