ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पदार्फाश, वेब सीरीजमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, नेमकं काय घडलं?
ठाण्यात सेक्स रॅकेटता पर्दाफाश झाला असून यामध्ये 10 सीरिज आणि 3 सिनेमांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. वेश्याव्यवसायात अभिनेत्री दलाल म्हणून काम करत होती. याप्रकरणी मोठा सापळा रचत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, या प्रकरणात एका हिंदी अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि त्यात कोणत्या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. याआधी देखील अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. आता देखील असंच काही घडलं आहे. पण जेव्हा याबद्दल पोलिसांनी कळलं तेव्हा त्यांनी मोठा सापळा रचत 2 महिलांची सुखरुप सुटका केली आहे… या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मोठी कारवाई करत, 2 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वागळे इस्टेटमधून प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक केलं आहे. वागळे इस्टेट परिसरातील बार अँड रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी सापळा रचला आणि सेक्स रॅकेटची पर्दाफाश केला.
हिंदी वेबसिरीज आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीने तब्बल 10 वेबसिरीज आणि 3 भोजपुरी सिनेमांमध्ये काम केल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री महिला व मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणणार असल्याची पोलिसांना मिळाली माहिती होती. अशात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन महिलांची सुटका केली आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी जवळपास 3 वाजता सापळा रचून अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली. चौकशीत अभिनेत्रीने मोठी घटना कबूल केली आहे. अभिनेत्री प्रत्येक ग्राहकाकडून 25 हजार रुपये घ्यायची आणि त्यातील 10 हजार रुपये मुलींना देत होती, तर उर्वरित 15 हजार रुपये ती स्वतः ठेवत होती.
याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई सध्या सुरु आहे. अशात याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पोलीस आता याप्रकरणी संबंधित अभिनेत्रीने आणखी किती महिलांनी इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसायात आणलं. त्यासाठी किती पैसे घेतले. अभिनेत्रीसोबत आणखी किती लोकांचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे… अशा अनेक पैलूंनी पोलीस कसून तपास करत आहेत.