“…नाही तर आम्ही आमची हळद उकिरड्यावर टाकू”; हळद उत्पादक शेतकऱ्यांवर अशी वेळ का आली

| Updated on: Apr 17, 2023 | 6:44 PM

हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता 7 हजार रुपयांपेक्षा जास्त हळदीला भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर फाशी घ्यायची वेळही आली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

...नाही तर आम्ही आमची हळद उकिरड्यावर टाकू; हळद उत्पादक शेतकऱ्यांवर अशी वेळ का आली
Follow us on

हिंगोली : हिंगोलीच्या संत नामदेव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हळदीच्या 10 हजार पोत्यांची आवक आली होती. यावेळी आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.आक्रमक शेतकऱ्यांनी दोन वेळा हळदीचा लिलाव थांबवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काही वेळ गोंधळ घातला होता. तर हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने फाशी घ्यायची वेळ आली असल्याचं मतही यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळाला नसल्याने यावेळी शेतकरी आक्रमक होत, लिलाव बंद पाडला होता. मात्र आता हळदीला भाव मिळत नसेल तर पिकवलेल्या हळदीचं करायचं काय असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी हळदीला वाशिम जिल्ह्यात 6 हजार 200 रुपये भाव मिळाला आहे तर हिंगोली जिल्ह्यात 5 हजार 100 व 5 हजार 200 असा भाव मिळत आहे.

एकीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे तर दुसरीकडे चार दिवसांपासून मार्केट कमिटीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना पाणी नाही, फॅन नाही तर रात्रीच्या वेळी मुक्काम करावा लागत असल्याने डासांचा प्रादूर्भावही वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्केट कमिटीतील या सोयी सुविधा नसल्याने या गोष्टींचाही सामना करावा लगात आहे.

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या हळदीला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने आता शेतकरी आक्रमक झाला आहे. बाजारभावाविषयी बोलताना शेतकऱ्यांनी आपली खंत व्यक्त करताना म्हणाले की, आमच्या हळदीला योग्य भाव दिला तर ठीक आहे नाही तर आम्ही आमची हळद उकिरड्यावर टाकू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता 7 हजार रुपयांपेक्षा जास्त हळदीला भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर फाशी घ्यायची वेळही आली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, आम्ही मार्केट कमिटीची फी भरतो मात्र तरीही आम्हाला कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. शेतकऱ्यांकडून सर्व प्रकारची फी भरून घेतली जात असेल तर आम्हाला सर्व मूलभूत सुविधा मार्केट कमिटीमध्ये देण्यात याव्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.