राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

बालभारतीच्या पुस्तकातील गणिताचा वाद कायम असताना, आता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कारण राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा इतिहास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 18:38 PM, 8 Jul 2019
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

नागपूर : बालभारतीच्या पुस्तकातील गणिताचा वाद कायम असताना, आता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कारण राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या इतिहासाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संघाचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात संघाचा इतिहास शिकवला जाणार आहे.

1885 ते 1974 या कालखंडात भारताचा इतिहास हा भाग शिकवताना संघाची स्वातंत्र्य लढ्यातील योगदानंही विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहेत. राज्यातील विद्यापीठात पहिल्यांदाच संघाचा इतिहास शिकवला जाणार आहे. संघाचा इतिहास अभ्यासक्रमात आल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून नेहमीच संघावर टीका केली जाते. संघाची शिकवण ही कायद्याविरोधी आणि संविधानविरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. शिवाय, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशाचं भगवीकरण सुरु असल्याचा वाद नेहमीच चर्चेत आहे. असं असताना आता संघाचा इतिहास थेट विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची चिन्हं आहेत.

संबंधित बातम्या :

फडणवीस = फडण दोन शून्य, बालभारतीचा वाद, अजित पवारांचंही सरकारला गणित

बालभारती वाद : जे शिक्षण आमदाराच्या मुलाला, तेच गरिबाच्या पोराला हवं : बच्चू कडू

बालभारतीचे भलते प्रयोग, ‘एकवीस’ऐवजी ‘वीस एक’