Sulli Deal : ‘सुल्ली डील’ प्रकरणाची गृहमंत्र्यांकडून तात्काळ दखल, वळसे-पाटलांचे कठोर कारवाईचे आदेश

‘सुल्ली डील’ प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील-यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिली आहे.

Sulli Deal : ‘सुल्ली डील’ प्रकरणाची गृहमंत्र्यांकडून तात्काळ दखल, वळसे-पाटलांचे कठोर कारवाईचे आदेश
dilip walse patil
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 4:54 PM

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील-यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिली आहे. महिला आयोगानेही याची गंभीर दखल घेतली आहे.

सारबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच CID मुंबई येथेही गुन्हा दखल करण्यात आला आहे, एका विशिष्ट समाजातील महिलांना अशा प्रकारे टार्गेट करणे दुर्दैवी आहे. याचा तपास करुन पुढील कारवाई तातडीने केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

‘गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाईचे आदेश

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या ‘गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. “सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लीम महिलांचे फोटो, फाईल व त्यासमोर त्यांची किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत; असे मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने दिसून येते. या सुल्ली डील ॲपवरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे. त्यामुळे सर्व समाज माध्यमंवरून ती माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी. तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत,” अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

Cashews | या कारणामुळे काजूचे सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक मानले जाते, जाणून घ्या त्याचे नुकसान!

Devon Ke Dev–Mahadev फेम मोहित रैनानं गुपचूप उरकलं लग्न, चाहत्यांना दिलं सरप्राइज

ट्रक अपघातात कामगार गंभीर जखमी; गडचांदूर -वनोजा मार्गावर संतप्त नागरिकांचे रास्तारोको आंदोलन