AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devon Ke Dev–Mahadev फेम मोहित रैनानं गुपचूप उरकलं लग्न, चाहत्यांना दिलं सरप्राइज

Devon Ke Dev–Mahadev मालिकेत भोलेनाथची भूमिका करून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता मोहित रैना(Mohit Raina)नं लग्न केलंय. त्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडिया(Social Media)वर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होतायत.

Devon Ke Dev–Mahadev फेम मोहित रैनानं गुपचूप उरकलं लग्न, चाहत्यांना दिलं सरप्राइज
मोहित रैना
| Updated on: Jan 02, 2022 | 4:36 PM
Share

नवीन वर्ष सुरू झालंय, तसं नवीन नवीन गोष्टी समोर येतायत. टीव्हीच्या विश्वातून एक मोठं सरप्राइझ आलंय. टीव्हीवर Devon Ke Dev–Mahadev मालिकेत भोलेनाथची भूमिका करून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता मोहित रैना(Mohit Raina)नं लग्न केलंय. होय. ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी थोडी आश्चर्याची आहे. मोहितची एक मैत्रीण आहे हे कोणाला माहीत असेल तरच नवल. तिच त्याची मैत्रीण अदिती आता त्याची बायको झालीय. त्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडिया(Social Media)वर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होतायत.

शेअर केले फोटो स्वत: अभिनेता मोहित रैनानं त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केलेत. लग्नाची ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. त्याला चाहत्यांसह इंडस्ट्रीकडून शुभेच्छा मिळतायत. या गुड न्यूजनं चाहतेही खूप खूश दिसतायत.

‘तुमच्या शुभेच्छा हव्यात’ फोटो शेअर करण्यासोबतच मोहितनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की प्रेमात कोणतेही अडथळे नसतात, प्रेम सर्व अडथळ्यांवर मात करतं, सर्व अडथळे पार करतं, कठीण भिंती तोडतं. प्रेम आशेनं भरलेलंय. आमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या आशेनं आणि प्रार्थनेच्या मदतीनं आम्ही आता दोन नाही तर एक झालो आहोत. या नवीन प्रवासासाठी आम्हा दोघांनाही तुमच्याकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत – अदिती आणि मोहित…

View this post on Instagram

A post shared by Mohit Raina (@merainna)

मौनी रायसोबत जोडलं गेलं होतं नाव अभिनेत्री मौनी रायसोबतच्या मोहित रैनाच्या नात्याच्या बातम्याही ऐकायला मिळायच्या. मात्र त्यानं हे वृत्त फेटाळून लावलं होतं. 2018मध्ये एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं, की तो आणि मौनी फक्त चांगले मित्र आहेत. दरम्यान, मोहित देवों के देव महादेव, मुंबई डायरी 26/11 आणि उरी द सर्जिकल स्ट्राइकमध्ये दिसलाय.

गौतम किचलूनं गोड बातमी सांगितल्यानंतर काजल अग्रवालनं शेअर केले ग्लॅमरस Photo

Kangana Ranaut : आपल्यावरचं संकट टळण्यासाठी कंगना रणौत राहू-केतूच्या चरणी! म्हणाली…

83, Spider Man, Pushpa : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटांनी केली धमाकेदार कमाई, पाहा Collection

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.