ट्रक अपघातात कामगार गंभीर जखमी; गडचांदूर -वनोजा मार्गावर संतप्त नागरिकांचे रास्तारोको आंदोलन

ट्रक अपघातात कामगार गंभीर जखमी; गडचांदूर -वनोजा मार्गावर संतप्त नागरिकांचे रास्तारोको आंदोलन

नांदाफाटा परिसरात असलेल्या रामनगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने सायकलस्वार कामगाराला उडवले. या अपघातामध्ये कामगार गंभीर जखमी झाला आहे.

निलेश डाहाट

| Edited By: अजय देशपांडे

Jan 02, 2022 | 4:32 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील नांदाफाटा परिसरात असलेल्या रामनगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने सायकलस्वार कामगाराला उडवले. या अपघातामध्ये कामगार गंभीर जखमी झाला आहे. मारोती  गुलबाजी नवघडे वय 55 असे या अपघातामध्ये जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांच्या उजव्या पायावरून ट्रक गेला आहे. दरम्यान या अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले, नागरिकांनी तब्बल चार तास रस्तारोको आंदोलन केले.

काम न लागल्याने निघाले घरी

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मारोती नवघडे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी सायकलवरून कंपनीत कामाला गेले होते. मात्र त्यांची ड्यूटी न लागल्याने  ते घरी परतत होते. याचदरम्यान त्यांना ट्रकने उडवले या भीषण अपघातामध्ये नवघडे गंभीर जखमी झाले आहेत. उपस्थितांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

वाहतूकीचा खोळंबा

या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या दुर्तफा अतिक्रमण वाढल्यानेच अपघात होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी रास्तारोको आंदोलन केले.  या आंदोलनामुळे तब्बल चार तास गडचांदूर -वनोजा राज्यमार्गावरील वाहतुकीचा खोंळबा झाला होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

संबंधित बातम्या

बस अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू, बेदरकार चालकाला 190 वर्षांची शिक्षा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार टँकरच्या खाली घुसली, काळ आता होता पण वेळ नाही

एकतर्फी प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या, भर बाजारपेठेत तरुणाचा हल्ला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें