एकतर्फी प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या, भर बाजारपेठेत तरुणाचा हल्ला

एकतर्फी प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या, भर बाजारपेठेत तरुणाचा हल्ला
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली

आरोपीचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, मात्र मुलीचा यासाठी स्पष्ट नकार होता. आरोपीने अनेक वेळा मुलीजवळ आपले प्रेम व्यक्त केले, मात्र ती तयार झाली नाही

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 02, 2022 | 2:06 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये 22 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. भर बाजारात तरुणीवर चाकूने वार करण्यात आले होते. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील नागल शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. भर बाजारपेठेत चाकूने भोसकल्यामुळे तरुणी जखमी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या नातेवाईकांनी त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणावर खुनाचा आरोप केला. पोलिसांनी तातडीने एक पथक तयार करून आरोपीला अटक केली.

एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला

आरोपीचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, मात्र मुलीचा यासाठी स्पष्ट नकार होता. आरोपीने अनेक वेळा मुलीजवळ आपले प्रेम व्यक्त केले, मात्र ती तयार झाली नाही. याचा राग आल्याने त्याने आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला आहे.

तरुणीचे लग्न ठरल्याने आरोपीचा संताप

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी तरुणालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एसपी (शहर) राजेश कुमार यांनी सांगितले की, आरोपीचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत, तरुणीचे लग्न इतरत्र ठरल्याने तरुण संतापला आणि त्याने तिच्यावर चाकूने वार केले.

संबंधित बातम्या :

पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात, चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर

मेट्रो कारशेडमध्ये लोखंडी गज उतरवताना अपघात, पिंपरीत 27 वर्षीय कामगाराचा मृत्यू

CCTV | घराबाहेर उभ्या तरुणांच्या अंगावर बुलेट घातली, उल्हासनगरात पोलिसांची दादागिरी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें