पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात, चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर

पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात, चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर
नागपुरात पिकअपचा भीषण अपघात

पहाटे चार वाजताच्या सुमारास बोलेरो वाहन चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. त्याच्यामध्ये तिघी जणींचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

सुनील ढगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 02, 2022 | 1:01 PM

नागपूर : बोलेरो पिकअप व्हॅनच्या भीषण अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात इतर पाच महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ईसापुर-घुबडमेट रस्त्यावर आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. परिसरातील संत्र्याच्या बगिच्यात संत्री तोडण्यासाठी महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने जात होत्या.

गाडी झाडावर आदळून अपघात

पहाटे चार वाजताच्या सुमारास बोलेरो वाहन चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. त्याच्यामध्ये तिघी जणींचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर जखमी

मनीषा सलाम, मंजुळा उईके, कलाताई परतेती आणि मंजुला धुर्वे अशी मयत महिला मजुरांची नावं आहेत. इतर पाच जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

मेट्रो कारशेडमध्ये लोखंडी गज उतरवताना अपघात, पिंपरीत 27 वर्षीय कामगाराचा मृत्यू

आधी आईला औषधाचा ओव्हरडोस दिला नंतर पॉलिथीनच्या पिशवीत तोंड बांधलं, पुढं जे घडलं त्यानं पुणे हादरलं

CCTV | घराबाहेर उभ्या तरुणांच्या अंगावर बुलेट घातली, उल्हासनगरात पोलिसांची दादागिरी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें