चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, धावत्या गाडीत चालकाला फिट, हायवानं 10 वाहनांना उडवलं

चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे, चंद्रपूरमध्ये भीषण अपघात घडला आहे. तुकुम -ताडोबा रस्त्यावर हा अपघात घडला. हायवा चालकाला फिट आल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे.

चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, धावत्या गाडीत चालकाला फिट, हायवानं 10 वाहनांना उडवलं
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 02, 2025 | 9:09 PM

चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे, चंद्रपूरमध्ये भीषण अपघात घडला आहे. तुकुम -ताडोबा रस्त्यावर हा अपघात घडला. हायवा चालकाला फिट आल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे. अनियंत्रित झालेल्या हायवानं फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली, तसेच या अपघातामध्ये हायवानं दहा वाहनांना देखील चिरडलं आहे. या अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून, एक तरुणी जखमी झाली आहे, जखमी तरुणीला स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू  

चंद्रपूरमध्ये हायवाचा भीषण अपघात झाला, हायवा चालकाला फिट आल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला अनियंत्रित झालेल्या हायवानं फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली, या अपघातामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारी लक्कडकोट येथील रहिवासी असलेल्या सानिका कुमरे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस होण्याचं या तरुणीचं स्वप्न होतं, त्यासाठी तीने तयारी देखील सुरू केली होती, मात्र या अपघातात सानिकाचा मृत्यू झाला आहे, पोलीस होण्याचं तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. सानिकाच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होतं आहे.

दहा वाहनांना उडवलं

धावत्या वाहनामध्ये चालकाला फिट आल्यामुळे हा अपघात घडला आहे, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं या हायवानं दहा वाहनांना देखील उडवलं आहे, या घटनेत या वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या अपघातानंतर पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघातामुळे महाऔष्णिक केंद्र 2, तुकूम, ताडोबा मार्ग आदी परिसरातील संध्याकाळच्या सुमारास होणारी वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी पुण्यात देखील असाच एक अपघात झाला होता, या अपघातामध्ये एका मद्यधुंद कार चालकाने पुण्यातील भावे स्कूल परिसरात एमपीएससीच्या बारा विद्यार्थ्यांना धडक दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं, कार चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे हा अपघात घडला होता. पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांना देखील या कारनं उडवलं होतं.