Video : राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कसा कोसळला? स्टेज कोसळल्यावर काय झालं? पाहा नवा Video

| Updated on: Feb 19, 2022 | 4:24 PM

मनसेच्या (Mns) या कार्यक्रमात चक्क स्टेज कोसळल्याचे दिसून आलं. राज ठाकरे याच स्टेजवर उभे होते. त्याच्या थोडा मागे स्टेज खचला. सुरूवातील यात काही महिलाही अडकल्याचे दिसून आले.

Video : राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कसा कोसळला? स्टेज कोसळल्यावर काय झालं? पाहा नवा Video
मनसेच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांचा आज गोरेगावत एक कार्यक्रम होता. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. कारण मनसेच्या (Mns) या कार्यक्रमात चक्क स्टेज कोसळल्याचे दिसून आलं. राज ठाकरे याच स्टेजवर उभे होते. त्याच्या थोडा मागे स्टेज खचला. सुरूवातील यात काही महिलाही अडकल्याचे दिसून आले. मात्र राज ठाकरे सुरक्षित आहे. त्यांना या गोंधळात काहीही झालं नाही. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असते. राज ठाकरेंच्या सभेला (Raj Thackeray Speech) मैदानेही तुडुंब भरतात. हाच प्रकार आज गोरेगावात झाला. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळेच स्टेज कोसळल्याचे बोलले जाते. यानंतर राज ठाकरेंनी स्टेजच्या पुढच्या भागात सरकत कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. मात्र स्टेज कोसळ्यल्याने काही काळ याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी राज ठाकरेंनी काळजी घेण्याचे आवाहनही केले.

कार्यकर्त्यांना राज ठाकरेंची तंबी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका येथील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शाखेचं काम कसं असावं याचं मार्गदर्शन करतानाच मनसे सैनिकांना त्यांनी जाहीपणे तंबीच दिली. या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे असा लोकांना विश्वास वाटला पाहिजे. ही शाखा आहे दुकान नाही, अशी तंबीच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाखा बांधणीपासून ते विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज साकीनाक्यात मनसेने शाखेची स्थापना केली आहे. साकीनाक्यात मनसेचं वर्चस्व होतं. मात्र, काही नगरसेवक शिवसेनेत गेल्याने मनसेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे साकीनाक्यात पुन्हा एकदा मनसेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत आहे.

शिवजयंतीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

शाखेचं उद्घाटन केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना शिवजयंती तिथीनुसारच साजरी करण्याचे आवाहन केलं. तसेच तिथीनुसारच शिवजयंती का साजरी करायची याचं महत्त्वही विशद केलं. व्यासपीठावर येण्याचं कारण तुमचं दर्शन व्हावं. हारतुरे घालायला मी आलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवजयंती तिथीने साजरी करते. याचा अर्थ आज शिवजयंती साजरी करायची असे नाही. आपल्या छत्रपतींचा जयजयकार आणि जयंती 365 दिवस साजरी केली पाहिजे. आजही साजरी केली तरी काही हरकत नाही. तिथीने साजरी केली तरी काही हरकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

VIDEO: राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला, काही महिला अडकल्या; गोरेगावात मनसेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

VIDEO: लोकांना न्याय द्या, ही शाखा आहे, दुकान नाही; राज ठाकरेंच्या मनसे सैनिकांना तंबी