VIDEO: लोकांना न्याय द्या, ही शाखा आहे, दुकान नाही; राज ठाकरेंच्या मनसे सैनिकांना तंबी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका येथील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शाखेचं काम कसं असावं याचं मार्गदर्शन करतानाच मनसे सैनिकांना त्यांनी जाहीपणे तंबीच दिली. या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे असा लोकांना विश्वास वाटला पाहिजे.

VIDEO: लोकांना न्याय द्या, ही शाखा आहे, दुकान नाही; राज ठाकरेंच्या मनसे सैनिकांना तंबी
लोकांना न्याय द्या, ही शाखा आहे दुकान नाही; राज ठाकरेंच्या मनसे सैनिकांना तंबी
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 1:00 PM

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्या हस्ते साकीनाका (sakinaka) येथील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शाखेचं काम कसं असावं याचं मार्गदर्शन करतानाच मनसे सैनिकांना त्यांनी जाहीपणे तंबीच दिली. या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे असा लोकांना विश्वास वाटला पाहिजे. ही शाखा आहे दुकान नाही, अशी तंबीच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे (mns) कार्यकर्त्यांनी शाखा बांधणीपासून ते विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज साकीनाक्यात मनसेने शाखेची स्थापना केली आहे. साकीनाक्यात मनसेचं वर्चस्व होतं. मात्र, काही नगरसेवक शिवसेनेत गेल्याने मनसेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे साकीनाक्यात पुन्हा एकदा मनसेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत आहे.

शाखेचं उद्घाटन केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना शिवजयंती तिथीनुसारच साजरी करण्याचे आवाहन केलं. तसेच तिथीनुसारच शिवजयंती का साजरी करायची याचं महत्त्वही विशद केलं. व्यासपीठावर येण्याचं कारण तुमचं दर्शन व्हावं. हारतुरे घालायला मी आलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवजयंती तिथीने साजरी करते. याचा अर्थ आज शिवजयंती साजरी करायची असे नाही. आपल्या छत्रपतींचा जयजयकार आणि जयंती 365 दिवस साजरी केली पाहिजे. आजही साजरी केली तरी काही हरकत नाही. तिथीने साजरी केली तरी काही हरकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

गणेशोत्सव तिथीनुसार, शिवजयंतीही तिथीनुसारच हवी

आपल्याकडे जेवढे सण येतात, मग ती दिवाळी, गणपती जेवढे काही सण येतात ते आपण तिथीने साजरे करतो. तारखेने साजरे करत नाही. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती. यावेळी दिवाळी त्याच तारखेला येत नसते. मागच्या वर्षी गणपती ज्या तारखेला आले त्याच तारखेला या वर्षी गणपती येत नसतात. गणेशोत्सव तिथीनुसार येतो. त्यामुळे शिवजयंतीही तिथीनुसारच साजरी केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. जन्म दिवस आणि वाढदिवस आपले. महापुरुषांचा तोही छत्रपतींचा जन्म दिवस आपल्यासाठी सण आहे. म्हणून तो सण तिथीने साजरा करायचा. म्हणजे तो आज केला पाहिजे असं नाही. जेव्हा तिथीने साजरी करायची तेव्हा याहून अधिक जल्लोषात साजरी करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

संबंधित बातम्या:

शिवजयंती तिथीनुसारच का साजरी करायची?, राज ठाकरेंनी सांगितलं कारण

यवतमाळच्या शिवभक्तानं घरावरच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, आर्णीच्या सचिन भोयर यांची संकल्पना

Maharashtra News Live Update : आताचे शिवसेना पक्षप्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आलेत : नारायण राणे

Non Stop LIVE Update
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.