तब्बल 2 वर्षानंतर तुळजाभवानी देवीच्या अभिषेक पूजा होणार सुरु; सायंकाळच्या अभिषेक पूजेबाबत अद्याप निर्णय नाही

| Updated on: May 23, 2022 | 11:54 PM

सायंकाळच्या अभिषेक पूजेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अभिषेक पुजा सुरु होणार असल्याने भक्तांना देवीचा नवसपूर्ती व कुलाचार पूजा करता येणार आहेत.

तब्बल 2 वर्षानंतर तुळजाभवानी देवीच्या अभिषेक पूजा होणार सुरु; सायंकाळच्या अभिषेक पूजेबाबत अद्याप निर्णय नाही
तुळजाभवानी मंदिरात पुजेला होणार प्रारंभ
Image Credit source: TV9
Follow us on

उस्मानाबाद: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (Tuljabhavani Temple) मातेच्या अभिषेक पूजा सुरु करण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोना निर्बंध लागू केल्यानंतर मागील दोन वर्षांपासून तुळजाभवानी देवीचे अभिषेक पूजा (Abhishekh Pooja) बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता तब्बल 2 वर्षानंतर या पूजा सुरु होणार आहेत. भाविक व पुजारी यांची अभिषेक पूजा सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. याला तुळजाभवानी मंदिर संस्थानने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या निर्णयामुळे देवी भक्तात आनंदाचे वातावरण आहे. दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत अभिषेक पूजा (Morning Abhishek) होणार आहेत. तुळजाभवानी देवीला सकाळी व सायंकाळी रोज अभिषेक पूजा असत मात्र आता केवळ सकाळी अभिषेक पूजा सुरु होणार आहे.

सायंकाळच्या पूजेबाबत निर्णय नाही

सायंकाळच्या अभिषेक पूजेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अभिषेक पुजा सुरु होणार असल्याने भक्तांना देवीचा नवसपूर्ती व कुलाचार पूजा करता येणार आहेत.

आता प्रथमच पुजेला प्रारंभ

तब्बल दोन वर्षानंतर तुळजाभवानी मातेचा अभिषेक सुरु करण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. कोरोनाच्या महामारीनंतर तुळजाभवानी मंदिरात आता प्रथमच पुजेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा पूर्वीसारखीच मंदिर परिसरात गर्दी होणार असल्याने भाविकांसह येथे असणाऱ्या व्यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

भाविक व पुजारी यांची मागणी

महाराष्ट्र, कर्नाटक ते अगदी आंध्र प्रदेशातून तुळजाभवानी मंदिरात भाविक येतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाविक व पुजारी यांती अभिषेक पूजा सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. मंदिर बंद असल्यामुळे येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला होता. त्यामुळे व्यावसायिकांमधूनही मंदिर खुले करुन पूजा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणी नंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने सकारात्म प्रतिसाद देऊन आता केवळ सकाळी अभिषेक पूजा सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.